Header Ads

Header ADS

रील बनवताय सावधान स्टंट बाजी करणाऱ्या तरुणांचा मृत्यू

 



रील बनवताय सावधान स्टंट बाजी करणाऱ्या तरुणांचा मृत्यू

लेवाजगत न्युज लुधियाना:- सध्या तरुणांमध्ये स्टंटबाजी करित रील बनवण्याचे भूत वावरत आहे. यात अनेक तरुणांचे अपघात होत आहेत. तर अनेकांना जीव देखील गमवावा लागत आहे. पंजाबमधील लुधियाना जिल्ह्यात अशीच एक घटना घडली आहे, ज्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. रील बनवण्यासाठी ट्रेनमध्ये स्टंट करणाऱ्या तरुणाचा मृत्यू झाल्याचा हा व्हिडिओ आहे.

    हा तरुण मालवा एक्सप्रेस ट्रेनमध्ये चढला होता. जो दिल्लीला जाणार होता. अचानक खन्ना येथील समराळा पुलापासून काही अंतरावर हा तरुण रेल्वेच्या दारात आला आणि बाहेर लटकून स्टंटबाजी करू लागला. दुसऱ्या दरवाज्याजवळ उभा असलेला दुसरा तरुण त्याचा व्हिडीओ बनवत होता. मात्र त्याचदरम्यान हा धक्कादायक अपघात झाला.

ट्रेनच्या एका दरवाज्यातून केला होता स्टंट, 

अन तो खांबावर जाऊन आदळला


१७ सेकंदाच्या व्हिडिओमध्ये स्टंट करणारा अवघ्या काही सेकंदातच तरुण खाली खांबावर आदळला. ट्रेनचा वेग इतका जास्त होता की तरुणाला सावरण्याची संधी मिळाली नाही आणि त्याचे डोके खांबाला जबरदस्त धडकले. तरुणाच्या मृतदेहाने जमिनीवरून सुमारे ३ ते ४ फूट उंचीवर उडी मारली. तरुणाचा जागीच मृत्यू झाला.


 हे पाहून व्हिडिओ बनवणारा तरुण घाबरला. त्यांनी इतर प्रवाशांना सांगितले, त्यांनी स्टेशन मास्टरला फोन करून माहिती दिली. ठाणे खन्नाच्या जीआरपीलाही माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेहाजवळून पोलिसांना कोणतेही ओळखपत्र, मोबाइल मिळाला नाही.


तरूणाचा बेवारस मृतदेह खन्ना येथील सिव्हिल हॉस्पिटलच्या शवागारात ठेवण्यात आला आहे. पोलीसांकडून मृताची ओळख पटविण्याचे काम काज सुरू होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.