Header Ads

Header ADS

धनाजी नाना महाविद्यालय हे ग्रामीण भागातील फर्ग्युसनच आहे: डॉ.एस.व्ही.जाधव

 

धनाजी नाना महाविद्यालय हे ग्रामीण भागातील फर्ग्युसनच आहे: डॉ.एस.व्ही.जाधव

धनाजी नाना महाविद्यालय हे ग्रामीण भागातील फर्ग्युसनच आहे: डॉ.एस.व्ही.जाधव

लेवाजगत न्यूज फैजपूर-येथील  धनाजी नाना महाविद्यालय हिंदी विभाग तर्फे आयोजित हिंदी सप्ताह निमित्त विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या त्यासाठी आज बक्षीस वितरण कार्यक्रम घेण्यात आला त्या प्रसंगी उप.प्राचार्य डॉ.एस. व्ही.जाधव अध्यक्ष स्थानी बोलत होते  त्यांनी सांगीतले की जेंव्हा पुण्यात वास्तव्य असलेले विद्यार्थी फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालय म्हणजे ग्रामीण भागातील फर्ग्युसनच आहे असे सांगतात तेंव्हा निश्चितच अभिमान वाटतो, जगात नावलौकिक असलेल्या महाविद्यालयाशी धनाजी नाना महाविद्यालय ची तुलना केली जात असेल तर तो मान टिकवून ठेवण्याची जबाबदारी अपना सर्वांचीच आहे, त्यासाठी विद्यार्थ्यांनी स्व.बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांनी ग्रामीण भागात सर्व सुविधांनी युक्त अशा महाविद्यालयाची निर्मिती का केली असावी या मागची भूमिका समजून घेतली पाहिजे, महाविद्यालयाच्या व्यवस्थापन मंडळाने ज्या सुविधा उभ्या केल्या आहेत त्याचा पुरेपूर लाभ घ्यावा आणि जीवनात पुढे जावे असे आवाहन केले या प्रसंगी पुढील विजयी स्पर्धकाचा पुरस्कार देवून  गौरव करण्यात आला.

रांगोळी स्पर्धा:

वरीष्ठ महाविद्यालय गट

दिशा अग्रवाल-प्रथम, तेजस्विनी कोळी - द्वितीय, तेजल भोई-तृतीय

कनिष्ठ महाविद्यालय

दीक्षा किरंगे-प्रथम, कोमल पाटील- व्दितीय, 

निबंध स्पर्धा:

वरीष्ठ महाविद्यालय गट

तडवी रुबिना-प्रथम, हर्षाला पाटील - द्वितीय, तेजस्विनी कोळी- तृतीय

कनिष्ठ महाविद्यालय

लविना बऱ्हाटे-प्रथम, मृणाली बोरसे- व्दितीय, 

काव्य वाचन स्पर्धा:

वरीष्ठ महाविद्यालय गट

पंकज बोदडे-प्रथम,माधुरी मालखेड - द्वितीय, वैष्णवी कुलकर्णी- तृतीय

कनिष्ठ महाविद्यालय

रोहिणी पाटील-प्रथम, कोमल पाटील- व्दितीय, 

मेहंदी स्पर्धा:

वरीष्ठ महाविद्यालय गट

दिशा अग्रवाल-प्रथम, कल्याणी महाजन-द्वितीय, आरती कोळी- तृतीय

कनिष्ठ महाविद्यालय

तेजस्विनी बजाज-प्रथम,अपर्णा चौधरी- व्दितीय,

सामान्य ज्ञान स्पर्धा:

वरीष्ठ महाविद्यालय गट

सागर सोनवणे-प्रथम, पंकज बोदडे- द्वितीय,नेहा तायडे-तृतीय

कनिष्ठ महाविद्यालय

तेजस्विनी बजाज-प्रथम, प्रेरणा माखिजा-व्दितीय,पूजा सोनवणे व श्रद्धा वाढे- तृतीय

वक्तृत्व स्पर्धा:

वरीष्ठ महाविद्यालय गट

पंकज बोदडे-प्रथम, ईश्वर चौधरी- द्वितीय,नेहा तायडे-तृतीय

कनिष्ठ महाविद्यालय

अपर्णा चौधरी-प्रथम, गुंजन जैन-व्दितीय

अश्या प्रकारे वरील सर्व विजयी स्पर्धकांचा सन्मान करण्यात आला  कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.कल्पना पाटील, सूत्र संचलन डॉ.सतीश पाटील यांनी तर आभार डॉ.विजय सोनजे  यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ.आय.पी.ठाकूर, डॉ. राजश्री नेमाडे,डॉ.सीमा बारी, प्रा.धीरज खैरे, विभागातील विद्यार्थी विद्यार्थिनी कृष्णा, स्वाती, राजश्री, मुर्तुजा, आशुतोष, तेजस्विनी, गायत्री,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.