Header Ads

Header ADS

बाप रे....तुर्कीतील कोळसा खाणीत भीषण स्फोट; २५ जणांचा मृत्यू, १२ कामगार अडकल्याची भीती

 

बाप रे....तुर्कीतील कोळसा खाणीत भीषण स्फोट; २५ जणांचा मृत्यू, १२ कामगार अडकल्याची भीती

लेवाजगत न्युज:-तुर्की इथे कोळसा खाणीत स्फोट झाल्याची घटना समोर येत आहे. या स्फोटात जवळपास २५ जणांनी आपला जीव गमावल्याची प्राथमिक माहिती हाती येत आहे. तर, १२ जणांहून अधिक खाणीत अडकले असून त्यांच्या बचावकार्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन करण्यात येत आहे. ही घटना शुक्रवारी काला सागर किनाऱ्यावर वसलेल्या बार्टिनच्या अमासरा शहरालगत असलेल्या सरकारी टीटीके अमासरा खाणीत घडली आहे.

तुर्कीचे आरोग्यमंत्री यांनी दिलेल्या माहितीनुसार, तुर्कीतील एका कोळसा खाणीत स्फोट झाला असून अंदाजे २५ जणांचा मृत्यू झाला आहे. खाणीत अनेक जण फसले असून बचावकार्याला सुरुवात झाली आहे. खाणीत झालेल्या स्फोट हा फायरएम्पमुळं झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. तुर्कीचे उर्जामंत्री फातिह डोनमेज यांनी ही माहिती दिली आहे.

स्फोट झाला तेव्हा खाणीत ११० लोक काम करत होते. ज्यावेळेस स्फोट झाला तेव्हा काही कामगारांना लगेचच बाहेर पडणे शक्य झाले. मात्र, ४९हून अधिक कामगार धोकादायक क्षेत्रात अडकले. खाणीत सापडलेल्या ४९पैकी काही कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं आहे. मात्र, अद्यापही खाणीत किती लोकं अडकले आहेत याचा आकडा समोर आलेला नाहीये. या दुर्घटनेत २५ लोकांचा मृत्यू झाला असून ८ कामगारांची प्रकृती चिंताजनक आहे.

स्फोटानंतर लगेचच तुर्कीचे राष्ट्रपती तईप एर्गोगन हे घटनास्थळी पोहोचण्यासाठी रवाना झाले आहेत. राष्ट्रपती आजचे आपले सगळे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. यावेळी त्यांनी एक ट्विटदेखील केलं आहे. खाणीत अडकलेले कामगार सुखरुप असावे अशी आशा आहे, असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

तुर्कीतील स्थानिक वेळेनुसार सव्वा तीनच्या सुमारास स्फोट झाला आहे. खाणीच्या प्रवेशद्वारापासून ३०० मीटर खोल हा स्फोट झाला असून ४४ कामगार खाणीच्या प्रवेशद्वारापासून ३०० मीटर खोल अडकले आहेत. तर ५ जण ३५० मीटर खोल खाली अडकले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.