आजपासून चार विशेष रेल्वे गाड्यांच्या ८२ फेऱ्या सणवारात भुसावळ विभागातील प्रवाशांना दिलासा
आजपासून चार विशेष रेल्वे गाड्यांच्या ८२ फेऱ्या
सणवारात भुसावळ विभागातील प्रवाशांना दिलासा
लेवाजगत न्यूज भुसावळ- दसरा, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गोरखपूर, नागपूर, समस्तीपूर बलियासाठी विशेष रेल्वेच्या महिनाभरात ८२ फेऱ्या होणार आहेत. या सर्व गाड्या मुंबईतून सुटल्यावर भुसावळ विभागातून धावतील. यामुळे गर्दीच्या हंगामात प्रवाशांची गैरसोय दूर होण्यास मदत होईल.
दसरा, दिवाळीला रेल्वे गाड्यांना खच्चून गर्दी होते. आरक्षण मिळत नसल्याने प्रवाशांचे हाल होतात. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने नवीन विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात दादर ते वलिया ही गाडी ३ ते ३१ ऑक्टोबर धावेल. ही गाडी दादर येथून सोमवारी, बुधवार व शुक्रवारी सुटेल. तर वलिया-दादर ही गाडी वलिया येथून बुधवार, शुक्रवार व रविवारी सुटेल. दादर-गोरखपूर एक्स्प्रेस आठवड्यातून चार दिवस धावेल.ही गाडी दादर येथून मंगळवार, गुरूवार, शुक्रवार, रविवार आणि गोरखपूर येथून ३ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर या काळात सोमवार, मंगळवार, गुरूवार व शनिवारी धावेल. मुंबई - मालदा टाऊन एक्स्प्रेस १४ व २४ ऑक्टोबरला मुंबईतून, तर मालदा टाऊन येथून १९ व २६ ऑक्टोबरला धावेल. मुंबई नागपूर गाडी २२ व २९ ऑक्टोबरला मुंबईतून सुटेल, तर नागपूर येथून २३ व ३० ऑक्टोबरला फेरी होईल. एलटीटी-गोरखपूर ही गाडी १९ व २६ आणि गोरखपूर-एलटीटी एक्स्प्रेस २१ व २६ रोजी धावेल. एलटीटी समस्तीपूर एक्स्प्रेस एलटीटी येथून २० ते ३० ऑक्टोबरला सुटेल. तर समस्तीपूर येथून ही गाडी २१ ते ३१ ऑक्टोबरला फेरी करेल. दरम्यान प्रवाशांनी या विशेष रेल्वे गाड्यांमधून प्रवासाचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत