हिंदू मुस्लीम ऐक्य पुन्हा दिसलं, मुस्लीम व्यक्तीची अत्यंयात्रा येताच दांडिया बंद, विजय महाराजांची समयसूचकता
हिंदू मुस्लीम ऐक्य पुन्हा दिसलं, मुस्लीम व्यक्तीची अत्यंयात्रा येताच दांडिया बंद, विजय महाराजांची समयसूचकता
लेवाजगत न्युज:-हिंदू संस्कृती आणि परंपरेने घालून दिलेला आदर्श आजही अबाधित असल्याचे प्रचिती जिल्ह्यातील दंगलग्रस्त म्हणून कूप्रसिद्ध असलेल्या अचलपूर येथे आली. अचलपूर सरमसपुरा येथील श्री जगदंबा देवी संस्थांन परिसरातील नवरात्र दांडिया सुरू असतानाच मुस्लीम समाजातील एका व्यक्तीची अंत्ययात्रा तिथून येत असल्याची माहिती मिळताच विजय महाराज भुजाडे यांना क्षणाचाही विलंब न करता आदेश दिला. भाविकांनी रंगात आलेला दांडिया थांबवत माणुसकी आणि सभ्यतेचा परिचय देत दोन धर्मातील सलोख्याची अनुभूती उपस्थितांना करुन दिली.
अचलपूर सरमसपुरा येथील ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या श्री जगदंब देवी संस्थान मध्ये नवरात्र उत्सवानिमित्त दांडिया महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. श्री जगदंब देवी आखाड्याचे संचालक मनोज भुजाडे यांच्या नेतृत्वात येथे दांडिया सुरू होता. दांडियाचे दोन राउंड झाल्यानंतर सुमारे नऊ वाजताच्या दरम्यान परिसरातील एका मुस्लीम व्यक्ती चा मृत्यू होऊन त्याची अंतयात्रा दांडिया मंडपाजवळ जात असल्याची माहिती मिळताच आखाड्याचे प्रमुख विजय महाराज भुजाडे यांनी आदेश देत रंगात आलेला दांडिया थांबवत धार्मिक सलोख्याचा परिचय दिला.
जातीय व धार्मिक दंगलींच्या दृष्टीने अचलपूर हे शहर अतिशय संवेदनशील शहर जिल्ह्यात परिचित आहे. यापूर्वी गणेशोत्सवा दरम्यान येथील गणेश भक्तांनी मुस्लीमांच्या यात्रेला रस्ता करून दिला होता. आज जगदंबा देवी संस्थान परिसरात दांडिया सुरू असताना आखाड्याचे प्रमुख श्री विजय महाराज भुजाडे यांनी धार्मिक सलोख्याचा आणि माणुसकीचा दाखला मुस्लीम अंत्ययात्रा जात असताना उत्सव थांबवण्याचे आदेश देत धार्मिक सलोखा दाखवून दिला.
सरमसपुरा येथिल जगदंबा देवी आखाडा हा कला क्रीडा व सांस्कृतिक योगदान देत आहे. मागील अनेक वर्षापासून या आखाड्याच्या माध्यमातून योगा दांडिया लेझीम कबड्डी कुस्ती या खेळांना प्रोत्साहन देत युवक व युवतींना निशुल्क मार्गदर्शन करण्यात येते. आखाड्याचे प्रमुख विजय महाराज भुजाडे यांनी युवकांना व्यसनापासून दूर ठेवत सुदृढ व निरोगी आयुष्य लाभाव यासाठी ते सतत काम करत करतात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत