आयशर-रिक्षाचा भीषण अपघात, ५ जण जागीच ठार जालना येथील घटना
आयशर-रिक्षाचा भीषण अपघात, ५ जण जागीच ठार जालना येथील घटना
लेवाजगत न्युज जालना:-: जालन्यात अॅपे रिक्षा आणि आयशर ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. मृतांमध्ये तीन पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे. ट्रक आणि रिक्षा यांच्यात झालेली धडक एवढी भीषण होती की रिक्षाचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. ठार झालेल्यांमध्ये २ महिलांचा तर ३ पुरुषांचा समावेश आहे.
जालन्यातील जाफराबाद-भोकरदन रस्त्यावर माहोरा गावाजवळ हा अपघात झाला. मृत्यूमुखी पडलेले सर्व प्रवासी बुलडाणा जिल्ह्यातील मोळवंडी गावातील रहिवासी आहेत. अपघात एवढा भीषण होता की, रिक्षामध्ये बसलेले ५ जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर स्थानिकांनी मदतकार्य करत जखमींना जाफराबाद येथील शासकीय रुग्णलयात उपचारासाठी दाखल केलं. तीन जणांवर तेथे उपचार सुरु आहेत.
या अपघातानंतर स्थानिकांनी मदतकार्य केलं. ऐन दिवाळीच्या तोंडावर हा अपघात झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत