पुण्यातील घटना: ब्रेकअपच्या रागातून गर्लफ्रेंडच्या घरात २७ तोळे सोन्याची चोरी
पुण्यातील घटना: ब्रेकअपच्या रागातून गर्लफ्रेंडच्या घरात २७ तोळे सोन्याची चोरी
लेवाजगत न्युज पुणे:- प्रेयसीसोबत नाते तुटल्याच्या (ब्रेकअप) रागातून प्रियकराने बदला घेण्यासाठी वेशांतर करुन प्रेयसीच्या घरात चोरी केली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी चोर प्रियकराला अटक केली असून त्याच्याकडून २८ तोळे दागिने आणि रोख रक्कम असा १४ लाख ६७ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सुमित बाबू परदेशी (रा. पद्मावती) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. २ ऑक्टोबर रोजी आंबेगाव येथील लक्ष्मी गार्डन सोसायटी भागात घरफोडीची घटना घडली होती. याबाबत कलाकार तरुणीने फिर्याद दिली होती. त्यानंतर भारती विद्यापीठ पोलीस चोरट्याचा शोध घेत होते.
पोलिसांनी घटनास्थळ आणि आजूबाजूचे सीसीटीव्ही चित्रीकरण तपासल्यानंतर संशयित व्यक्ती दिसून आली. परिसरातील इतर सीसीटीव्हीचे चित्रीकरण तपासल्यानंतर आरोपीची ओळख पटली. त्यानुसार परदेशी याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
सुमित याच्याकडून गुन्ह्यातील २८ तोळे दागिने आणि रोख रक्कम असा १४ लाख ६७ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस उपायुक्त सागर पाटील आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहीरट यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक अमोल रसाळ, अंमलदार गणेश भोसले, मंगेश पवार, हर्षल शिंदे आणि धनाजी धोत्रे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
प्रेयसीला धडा शिकवण्यासाठी यूट्यूबवरुन चोरीचे प्रशिक्षण
फिर्यादी तरुणी आरोपी सुमित याची प्रेयसी असून त्यांचे नाते तुटले आहे. प्रेयसी इतर व्यक्तीशी बोलत असल्याच्या रागातून सुमित याने बदला घ्यायचा ठरवला. प्रेयसीला धडा शिकविण्यासाठी सुमितने यूट्यूबवर चोरी कशी करावी, याची माहिती घेतली. त्यानंतर मास्क घालून वेशांतर करून घरफोडी केली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत