Header Ads

Header ADS

जळगाव येथे आयोजित तायक्वांडो पंच परीक्षेत ३९७ तायक्वांडो खेळाडूंचा सहभाग. आंतरराष्ट्रीय पंच सुभाष पाटील यांच्या मार्गदर्शनाने पार पडला सेमिनार

 

जळगाव येथे आयोजित तायक्वांडो पंच परीक्षेत ३९७ तायक्वांडो खेळाडूंचा सहभाग.  आंतरराष्ट्रीय पंच सुभाष पाटील यांच्या मार्गदर्शनाने पार पडला सेमिनार

जळगाव येथे आयोजित तायक्वांडो पंच परीक्षेत ३९७ तायक्वांडो खेळाडूंचा सहभाग.

आंतरराष्ट्रीय पंच सुभाष पाटील यांच्या मार्गदर्शनाने पार पडला सेमिनार

लेवाजगत न्यूज उरण (सुनील ठाकूर ) : तायक्वांडो असोसिअशन ऑफ महाराष्ट्र ( मुंबई ) या अधिकृत संघटनेमार्फत दी. १ व २ ऑक्टोबर २०२२ रोजी, जळगाव जिल्हा क्रीडा संकुल येथे राज्यस्तरीय तायक्वांडो पंच परीक्षा सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते, या सेमिनारमध्ये महाराष्ट्रातून ३९७ तायक्वांडो पट्टूनी सहभाग नोंदिवला.

        जागतिक तायक्वांडो संघटनेमार्फत १ सप्टेबर २०२२ पासून या खेळासाठी नवीन नियमावली तयार केली आहे आणि या नवीन नियमावलीचा अभ्यास महाराष्ट्रातून एकमेव आंतरराष्ट्रीय पंच सुभाष पाटील यांनी रीफ्रेशेर कोर्स करून व नुकताच इस्राइल येथील पार पडलेल्या जागतिक तायक्वांडो स्पर्धेत पंच म्हणून उत्तम कामगिरी करून नवीन नियमांचा अभ्यासही केला. 

       या अनुभवाचा फायदा घेत सुभाष पाटील यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील तायक्वांडो खेळाडूना नवीन नियमावलीचे प्रशिक्षण दिले, व निवडक ३९७ तायक्वांडो पट्टूची पंच परीक्षा घेतली, आज ३९७ उत्तीर्ण पंचांचा संपूर्ण महाराष्ट्रात चांगले खेळाडू तयार होण्यास मदत होईल असे आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.

      सुभाष पाटील हे अनेक देशात जाऊन जागतिक तायक्वांडो स्पर्धेत आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करतात, सुभाष पाटील हे ७ डिग्री black belt ( दक्षिण कोरिया ) तसेच आंतरराष्ट्रीय पंच ( 1st Class ) आणि कॉमनवेल्थ रेफ्री कमिटीमध्ये सदस्य आहेत.

      या सेमिनारच्या उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास, वैद्यकीय, शिक्षण तसेच क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना. गिरीश महाजन साहेबांनी सुभाष पाटील यांचा विशेष सत्कार केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.