अंडाकरी का नाही बनवली, मुलाचं डोकं फिरलं, दसऱ्याला घरी आलेल्या आईचाच जीव घेतला
अंडाकरी का नाही बनवली, मुलाचं डोकं फिरलं, दसऱ्याला घरी आलेल्या आईचाच जीव घेतला
लेवाजगत न्युज:-ओदिशामध्ये एका मुलाने आपल्या ५० वर्षीय आईची हत्या केली. कारण तिने मुलाचे आवडता पदार्थ बनवला नाही. ही हृदयद्रावक घटना गंजाम जिल्ह्यातील आहे. दारुच्या नशेत असलेल्या या मुलाने दसऱ्याला घरी आलेल्या आईला अंडा करी बनवायला सांगितली होती.
आईने त्याचे ऐकले नाही, म्हणून त्याने आईचं डोकं भिंतीवर आपटले. यानंतर आईला गंभीर दुखापत झाली. मात्र, तरी हा मुलगा इथेच थांबला नाही. त्याने लोखंडी रॉडने आईचे डोके फोडले. ज्यानंतर तिचा तडफडून मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी मुलाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना गंजाम जिल्ह्यातील तारसिंग पोलीस स्टेशन क्षेत्रातील गजपदर गावातील आहे. येथे सनातन नावाची व्यक्ती एकटीच राहत होती. दसऱ्याला त्याची आई त्रिबेणी त्याला भेटायला घरी आल्या होत्या. मात्र, हा दसरा त्यांच्या आयुष्यातील अखेरचा दसरा ठरेल असा त्यांनी विचारही केला नसेल. त्रिबेणी आंध्र प्रदेशातील कोळंबी प्रक्रिया कारखान्यात काम करत होत्या. दसऱ्याला त्या मुलाला भेटायला आल्या होत्या. घरात हाणामारी आणि आरडाओरड झाल्याचा आवाज ऐकून शेजारीही जमा झाले पण सनातनला कोणीही रोखू शकले नाही.
बायकोही निघून गेली
सनातनच्या सवयींना कंटाळून त्याची पत्नीही त्याला सोडून गेली आहे. ती तिच्या आई-वडिलांच्या घरी राहते. त्याचवेळी त्रिबेणी या देखील वाईट वागणूक आणि अंमली पदार्थांच्या व्यसनामुळे घर सोडून आंध्र प्रदेशात गेल्या होत्या. तेथे ती कोळंबी प्रक्रिया करणाऱ्या कारखान्यात काम करत होती.
दसऱ्याला आई घरी आली
त्रिबेणी या आपल्या मुलाला भेटण्यासाठी दसऱ्याला घरी आल्या होत्या, त्या काही दिवस इथेच राहिल्या. दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी त्यांचा मुलगा सनातन याने त्यांना रात्रीच्या जेवणात अंडा करी बनवण्यास सांगितले होते. त्यानंतर तो दारु आणण्यासाठी निघून गेला. तो परत आला तेव्हा तो दारुच्या नशेत होता. त्याने आईला विचारले की अंडा करी बनते का? त्रिबेणी यांनी नकार दिल्याने त्यांने रागाच्या भरात आधी त्यांचं डोकं भिंतीवर आपटलं, मग त्यांच्यावर रॉडने हल्ला करुन त्यांची हत्या केली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत