Header Ads

Header ADS

मनमाड जवळ ब्लॉक महाराष्ट्र सह १० ट्रेन रद्द

Manmad-Near-Block-Maharashtra-Six-10-Train-Cancelled


 मनमाड जवळ ब्लॉक महाराष्ट्र सह १० ट्रेन रद्द 

लेवाजगत भुसावळ -मध्य रेल्वेने बुधवार (दि.१९) व गुरूवारी (दि. २०) असे दोन  दिवस मनमाड जवळ ब्लॉक घेतला आहे. यामुळे महाराष्ट्र एक्स्प्रेससह अन्य १० गाड्या रद्द केल्या आहेत.मनमाड-दौंड सेक्शनमध्ये ब्लॉक घेतल्याने रेल्वे प्रशासनाने १० गाड्या रद्द केल्या आहेत. दरम्यान, रद्द झालेल्या गाड्यांमध्ये दादर-साईनगर शिर्डी एक्स्प्रेस १९ व २० ऑक्टोबर , साईनगर-दादर एक्स्प्रेस १९ व २० ऑक्टोबर तसेच पुढील गाड्या बुधवार, गुरुवारी रद्द केल्या आहेत.



     यात पुणे-निजामाबाद (१९), निजामाबाद-पुणे (१९ व २०), गोंदिया -कोल्हापूर  महाराष्ट्र एक्स्प्रेस (१९ व २०), भुसावळ-पुणे हुतात्मा एक्स्प्रेस दोन्ही बाजूने दि. २० रोजी रद्द केली आहे. पुणे-नागपूर (२२१४१) ही गाडी गुरूवारी (दि.२०) दोन्ही मार्गावर रद्द आहे. पुणे-अजनी एक्स्प्रेस शुक्रवारी (दि.२१) रद्द केली आहे.


बातमी शेअर करा 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.