Header Ads

Header ADS

कमळ गट्ट्यांच्या माळा पहिल्यादाच यावर्षी बाजारात विक्रीला

 

Lotus-garlands-on-sale-for-the-first-time-this-year-in-the-market

कमळ गट्ट्यांच्या माळा पहिल्यादाच यावर्षी बाजारात विक्रीला 

लेवाजगत न्यूज सावदा -दिवाळीत लक्ष्मी पूजनासाठी वापरली जाणारी कमळ गट्ट्यांची माळ शहरात प्रथमच विक्रीसाठी आली आहे. ४० ते ६० रूपये किंमतीच्या या माळेत १०८ मणी आहेत. मुंबई येथून सुमारे १० हजार माळा शहराच्या बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत.दिवाळीत लक्ष्मी पूजनाचे महत्त्व असते. कारण लक्ष्मी माता कमळाच्या फुलात विराजमान असते. त्यामुळे लक्ष्मी पूजनावेळी कमळ फुलांसह कमल गट्टे आवश्यक ठरतात. यापूर्वी शहराच्या बाजारात कमळ फुले विक्रीस आली होती. मात्र, यंदा प्रथमच कमळगट्टे देखील उपलब्ध आहेत. लक्ष्मीची मूर्ती किंवा प्रतिमेस ही माळ घातली जाते. शहरातील पूजा साहित्य विक्रेते अनिल टाक यांनी सांगितले की, दाेन दिवसांपूर्वीच कमल गट्ट्यांच्या माळा मुंबई येथून विक्रीसाठी आणल्या. त्यास ग्राहकांकडून चांगली मागणी देखील आहे.

   कमळाच्या बियांचा सुकवून करतात वापर

कमळ गट्ट्यांची माळ कमळ फुलांच्या बियांपासून तयार केली जाते. बिया सुकल्यावर त्यांना आकार देऊन मणी व नंतर माळ तयार केली जाते. अत्यंत सुंदर असलेली ही माळ भाविकांच्या पसंतीस पडते.

    लक्ष्मीपूजन, जपासाठी माळ महत्त्वाची

लक्ष्मीमातेला जसे कमळ पुष्प प्रिय आहे, तसेच कमळगट्टूंची माळ जप करण्यासाठी महत्त्वाची आहे. भाविकांनी या माळेचा वापर करून लक्ष्मीमातेच्या मंत्राचा जप करावा.

पं.विनायक जाेशी, भुसावळ

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.