Header Ads

Header ADS

फैजपूर येथे महिला उद्योजिका साठी एमआयडीसी स्थापन करा; नारीशक्तीच्या दिपाली चौधरींची उद्योग मंत्र्यांकडे‌ मागणी निवेदनाची दखल घेत मंत्री महोदयांनी दिले उचित कार्यवाही करण्याचे प्रधान सचिवांना निर्देश

 

फैजपूर येथे महिला उद्योजिका साठी  एमआयडीसी स्थापन करा; नारीशक्तीच्या दिपाली चौधरींची उद्योग मंत्र्यांकडे‌ मागणी  निवेदनाची दखल घेत मंत्री महोदयांनी दिले उचित कार्यवाही करण्याचे प्रधान सचिवांना निर्देश

फैजपूर येथे महिला उद्योजिका साठी  एमआयडीसी स्थापन करा; नारीशक्तीच्या दिपाली चौधरींची उद्योग मंत्र्यांकडे‌ मागणी

निवेदनाची दखल घेत मंत्री महोदयांनी दिले उचित कार्यवाही करण्याचे प्रधान सचिवांना निर्देश


लेवाजगत न्यूज फैजपूर : फैजपूर येथे पहिली महिला एमआयडीसी स्थापन करावी व यावल रावेर परिसरात उद्योगांना योग्य ते सहकार्य करुन चालना द्यावी अशी मागणी खान्देश नारीशक्ती फाऊंडेशन अध्यक्षा सौ.दिपाली चौधरी झोपे यांनी महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री माननीय ना.उदयजी सामंत यांच्याकडे मंत्रालयात प्रत्यक्ष भेटून केली आहे.

       दरम्यान मंत्रालयात काल दुपारी पहिल्या मजल्यावर असलेल्या उद्योग मंत्री ना.उदय सामंत यांच्या कार्यालयात मिटिंग आयोजित करण्यात आली होती. यावेळी राज्यातील पहिली महिला एमआयडीसी ( MIDC) फैजपूर येथे स्थापन करण्यात यावी याविषयी चर्चा करण्यात आली. नारीशक्ती अध्यक्षा सौ दिपाली चौधरी यांनी मंत्रिमहोदयांच्या सविस्तर लक्षात आणून दिले कि फैजपूर हे रावेर व यावल तालुक्यातील मध्यवर्ती शहर असून या परिसरात एमआयडीसी कार्यान्वित करण्यासाठी सर्व सोयीसुविधा उपलब्ध आहेत. राष्ट्रीय महामार्गावर हे शहर वसलेले असून भुसावळ जंक्शन देखील येथून जवळच आहे त्यामुळे दळणवळणाची सोय देखील चांगली असल्याने आपण या प्रस्तावावर सकारात्मक विचार करून फैजपूर येथे महिला एमआयडीसी स्थापन करण्यात यावी यामुळे हजारो रोजगार उपलब्ध होतील, महिला सक्षम होतील व इतर ग्रामीण भागातील महिलांना देखील उद्योजक होण्यासाठी प्रेरणा मिळेल अशी विनंती देखील यावेळी सौ.दिपाली चौधरी झोपे यांनी उद्योग मंत्र्यांकडे‌ केली आहे.


*उचित कार्यवाही करावी; मंत्री महोदयांची प्रधान सचिवांना सुचना*


          उद्योग मंत्री उदय सामंत यांनी फैजपूर येथे महिला एमआयडीसी स्थापन करण्या संदर्भात खान्देश नारीशक्ती फाऊंडेशन अध्यक्षा सौ.दिपाली चौधरी झोपे यांच्यासोबत सविस्तर चर्चा करुन सकारात्मक प्रतिसाद दिला व सदर निवेदनाची नोंद घेऊन उचित कार्यवाही करावी अशी टिप्पणी करुन निवेदन पुढील कार्यवाही साठी उद्योग विभागाचे प्रधान सचिव यांच्याकडे पाठवले आहे. दरम्यान नारीशक्ती फाऊंडेशन तर्फे फैजपूर येथे महिला एमआयडीसी बाबत प्रत्यक्ष उद्योग मंत्र्यांकडे मुद्दा उपस्थित करण्यात आल्याने फैजपूर परिसरातील नागरिक व महिलांच्या आशा पल्लवित झाल्या असून यामुळे पुन्हा या परिसराला गतवैभव प्राप्त होऊन रोजगाराच्या संधी निर्माण होतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.