चिनावल जवळ अवैध गोवंश वाहतूक करणाऱ्या वाहनांना पकडले गो भक्तांच्या सतर्कतेमुळे वाचले गोधन
चिनावल जवळ अवैध गोवंश वाहतूक करणाऱ्या वाहनांना पकडले
गो भक्तांच्या सतर्कतेमुळे वाचले गोधन
सावदा / चिनावल ( वार्ताहर ) कुभारखेडा चिनावल रस्त्यांवर अवैध रित्या गोवंश वाहतूक करणाऱ्या वाहनांची चिनावल येथील गो भक्तांना माहिती मिळाल्याने आज दि ११ रोजी सकाळी सावदा पोलिसांच्या मदतीने वाहनांना पकडून सावदा पोलिसांत या प्रकरणी नोंद करण्यात आली आहे
या बाबत फिर्यादी पोहेका सुधीर मोरे यांच्या फिर्यादीवरून सावदा पोलिसांनी नोंद केली यात चिनावल येथील गो भक्तांना या अवैध वाहतूक ची माहिती मिळाली त्यांनी या बाबत खात्री झालेवर सावदा पोलिस स्टेशन ला या बाबतीत माहिती देवून कुभारखेडा रस्त्यावर निर्मल युवराज महाजन यांचे शेताजवळ सकाळी ६ वा.१५ मि. एम एच ०४ डी के ५१०२ मालवा व एम एच ०४ इ वाय २११८ छोटा हत्ती या गाड्या अडवून गाडी चालकांनी दाटी वाटी ने गायी व वासरे कोंबून मान व पाय दोराने बांधून हालचाली स पुरेशी जागा न ठेवता एका ठिकाणाहून दुसरीकडे नेणे हा गुन्हा करीत असताना पकडले त्यांची खबरी वरून वरील तक्रार दाखल झाली आहे यात गायी वासरे तसेच गाडी सह सुमारे सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे सदर बाबत सावदा पोलिसांत सीडीएम एस १९/ २२ अन्वये प्राण्याचा छळ कायदा अधिनियम १९६० कलम ११ ( १ ) १९८९ चे कलम ११९ मोटर वाहन अधिनियम १९८९ कलम ८३ अन्वये फिर्याद दाखल होवून शै आबीद उर्फ नव्वद व मो.फैजान शेख सगिर या सावदा यांना ताब्यात घेतले आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत