Header Ads

Header ADS

विरारमध्ये गरबा खेळण्यावरून दोन गटात वाद; मध्यस्थी करायला गेलेल्या तरुणाची हत्या

Quarrel-between-two-groups-over-playing-Garba-in-Virar-The-murder-of-a-young-man-who-went-to-mediate

 विरारमध्ये गरबा खेळण्यावरून दोन गटात वाद; मध्यस्थी करायला गेलेल्या तरुणाची हत्या

वृत्तसंस्था विरार : विरार मध्ये गरब्यात खेळण्यावरून दोन गटात भांडणे झाली. त्यात भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तरूणालाच मारहाण करण्यात आली. या मारहाणीत या तरुणाचा मृत्यू झाला. या प्रकरणानंतर संतप्त नागरिकांनी विरार पोलीस ठाण्यात गोंधळ घातला. .विरार पूर्वेच्या सहकार नगर परिसरात बिठूरमाळी कंपाऊंड येथे राहणारा केस कर्तनाचा व्यवसाय करणारा बैजनाथ शर्मा (२९) बुधवारी आपले दुकान बंद करून घरी गेला होता. यावेळी सोसायटीच्या गरब्यात भांडणे सुरू असल्याचे त्याला कळले आणि तो परत आला. 


यावेळी दोन गटात गरबा खेळण्यावरून भांडण झाल्याचे त्याला समजले असता तो भांडण सोडवू लागला असताना त्यालाच सात ते आठ जणांनी लोखंडी सळईने मारहाण केली. यात शर्मा गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी संजीवनी रुग्णालयात दाखल केले असता गुरूवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. यावेळी संतप्त जमावाने विरार पोलीस ठाण्यात गर्दी करत पोलिसांना घेराव घातला. या संदर्भात माहिती देताना सहायक पोलीस आयुक्त रामचंद्र देशमुख यांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.