Header Ads

Header ADS

अंबानी कुटूंबाला धमकी दिल्या प्रकरणी बिहार मधून एक जण ताब्यात

 

अंबानी कुटूंबाला धमकी दिल्या प्रकरणी बिहार मधून एक जण ताब्यात 

वृत्तसंस्था मुंबई : रिलायन्स उद्योग समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.याप्रकरणी बिहार येथील दरभंगा येथून एका संशयीताला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बुधवारी एका अज्ञात व्यक्तीने रिलायन्स फाऊंडेशनच्या रुग्णालयाला दोन दूरध्वनी करून धमकी दिली होती. याप्रकरणी डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करुन पोलीस धमकी देणाऱ्याचा शोध घेत आहेत. दरम्यान, धमकीच्या दूरध्वनीनंतर अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाची सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.


सर एच. एन. रिलायन्स फाउंडेशन रुग्णालयातील दूरध्वनीवर बुधवारी दुपारी १२ वाजून ५७ मिनिटांनी व सायंकाळी ५ च्या सुमारास एका अज्ञात क्रमांकावरून दोन दूरध्वनी आले होते. दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने रिलायन्स रग्णालय उडवून देण्याची धमकी दिली. तसेच मुकेश अंबानी, त्यांची पत्नी नीता अंबानी, आकाश अंबानी व अनंत अंबानी यांना जीवे ठार मारण्याची आणि अंबानी कुटुंबियांचे अँटेलिया हे निवासस्थानही उडवण्याची धमकी दिली. याप्रकरणी तक्रार करण्यात आल्याचे रिलायन्स समुहाकडून सांगण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.