Header Ads

Header ADS

राम शिंदेंचं रोहित पवारांना प्रत्युत्तर, '...सगळे लोक चॉकलेटवरच गंडतात असं नाही'


 राम शिंदेंचं रोहित पवारांना प्रत्युत्तर, '...सगळे लोक चॉकलेटवरच गंडतात असं नाही'

 लेवाजगत न्युज:-बारामती ॲग्रो साखर कारखान्याच्या ऊस गाळपावरून राजकारण तापलं आहे. चौकशीला घाबरायचं नसतं, चूक केली तर त्याची शिक्षा भोगायची असते. चॉकलेट वाटून तुम्ही निवडून आलात म्हणजे लोक सगळे चॉकलेटवरच गंडतात असं नाही, अशी कोपरखळी भाजपचे आमदार राम शिंदे यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना मारली आहे. ते कर्जत येथील कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलत होते.

बारामती ॲग्रो कारखान्यावरून राजकारण तापले असताना रोहित पवार यांनी काल राम शिंदेंवर टीका केली होती. लहानपणी छोट्या पोराला चॉकलेट मिळाले नाही की ते कसं करतं? तसं आमचे विरोधक करत आहेत, असा टोला रोहित पवार यांनी लगावला होता. त्याला राम शिंदे यांनी प्रत्युत्तर देत रोहित पवार यांना या टोला लागला आहे.

सामाजिक आणि राजकीय जीवनात राजकीय आरोप प्रत्यारोप होत असतात. लोक प्रतिनिधींनी चीडायचं नसतं. मी देखील जलसंधारण मंत्री होतो. त्याची देखील चौकशी झाली. एसीबीची खुली चौकशी झाली तरी ती करू नका, असं मी कधीही म्हटलो नाही. परंतु आपलाच कारखाना फक्त हा महाराष्ट्राताली शेतकऱ्यांचा हिताचा आहे, असा दावा करणं योग्य नाही. अजितदादांसह इतर कारखाने शेतकरी हिताच्या विरोधात नाही. रोहित पवार यांनी आर्धी चूक मान्य केलेली आहे. कारखाना सुरू होता, असं राम शिंदे म्हणाले.

शेखर गायकवाड हे दीड महिन्यांनी निवृत्त होणार आहेत. ते निवृत्त झाल्यानंतर वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटमध्ये त्यांना एमडी म्हणून घेणार आहेत, अशी माहिती आहे. त्यामुळे गायकवाड यांनी या प्रकरणात २० तास उशिराने चौकशी केली. रात्रभर कारखाना आणि गव्हाण ते धूत होते. ही आपल्याकडे माहिती आहे. यासंबंधी व्हिडिओ आपण सहकार खात्याला दिले आहेत. म्हणून त्यांनी चौकशीला घाबरायचं नसतं. चूक केली तर त्याची शिक्षा भोगायची असते. लोकप्रतिनिधींनी असं बोलणं योग्य नाही. चॉकलेट वाटून तुम्ही निवडून आला म्हणजे लोक सगळे चॉकलेटवरच गंडताच असं नाही, असं म्हणत राम शिंदे यांनी रोहित पवारांना टोला लगावला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.