सावद्यात कार्डधारकांना रेशन किटची प्रतीक्षाच लेवाजगत न्यूज सावदा -
सावद्यात कार्डधारकांना रेशन किटची प्रतीक्षाच
लेवाजगत न्यूज सावदा - येथील स्वस्त धान्य दुकानांवर वाटप होणाऱ्या आनंदाच्या शिधा या उपक्रमात, अद्यापही रेशन किट उपलब्ध न झाल्याने शहरातील, पात्र लाभार्थ्यांची दिवाळी अंधारात जाण्याची चिन्हे आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व फडणवीस सरकारने यंदा शंभर चार वस्तू देण्याचे नियोजन केले होते. पण सावदा शहरात दिवाळीला प्रारंभ होऊनही कार्डधारकांना रेशन किट मिळालेले नाही, अंत्योदय व केशरी कार्डधारकांना शिधा संच वाटप केले जाणार आहेत. या लाभार्थ्यांची प्राधान्यक्रमाच्या केसरी शिधाधारक व -अंत्योदय योजनेतील कार्डधारकांना रेशन किटची प्रतीक्षा आहे. यासंदर्भात बोलताना धान्य दुकानदारांनी सांगितले की, आमच्याकडे काही वस्तू उपलब्ध झाल्या असून, काही वस्तू उपलब्ध होणार आहे. तसेच किट ठेवण्यासाठी मिळणारी पिशवी उपलब्ध नसल्याने, स्वस्त धान्य दुकानदारांनी सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत