दक्षिण ऑस्ट्रेलिया युनिव्हर्सिटीतून सावद्याच्या सायमा खानचे इंटरनॅशनल एमबीए परिक्षेत यश
दक्षिण ऑस्ट्रेलिया युनिव्हर्सिटीतून सावद्याच्या सायमा खानचे इंटरनॅशनल एमबीए परिक्षेत यश
लेवाजगत न्यूज सावदा -येथील सायमा खान अख्तर खान हिने दक्षिण ऑस्ट्रेलिया युनिव्हर्सिटीतून एमबीए परिक्षेत पहिल्या १५ विद्यार्थ्यांमध्ये उत्तीर्ण होऊन स्थान मिळविले आहे.
सविस्तर वृत्त असे की, सावदा शहरातील प्रसिद्ध गोल्डन ट्रान्सपोर्टचे संचालक अख्तरखान हाजी हबीबुल्ला खान पठाण यांची द्वितीय मुलगी सायमा खान अख्तरखान हिने दक्षिण ऑस्ट्रेलियातील युनिव्हर्सिटी मध्ये इंटरनॅशनल एमबीए परिक्षेत घवघवीत यश संपादन करून पहिल्या पंधरा विद्यार्थ्यांमध्ये स्थान मिळविले आहे. तिच्या यशाबद्दल सावदासह परिसरात अभिनंदन होत आहे. तिने कुलाबा येथे इंजीनियरिंग केले असून त्यानंतर ती दक्षिण ऑस्ट्रेलिया येथे एमबीए शिक्षणासाठी गेली होती. एमबीए परिक्षेत विशेष प्राविण्यासह प्रथम श्रेणीत पहिल्या पंधरा मध्ये स्थान मिळाल्याने तिच्या सह तिच्या पालकांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत