शेकाप माजी सभापती ऍड. सागर कडू यांच्या वाढ दिवसा निमित्त अबाल वृद्धांना विशेष भेट
शेकाप माजी सभापती ऍड. सागर कडू यांच्या वाढ दिवसा निमित्त अबाल वृद्धांना विशेष भेट
लेवाजगत न्यूज उरण ( सुनिल ठाकूर ). मंगळवार दिनांक 11 ऑक्टोबर 2022 रोजी जेष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र आणि पंचायत समिती उरण च्या माध्यमातून अंगणवाडी चे उदघाटन समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. उरण तालुक्यातील मुळेखंड फाटा करंजा रोड येथे चाणजे विभाग. शेतकरी कामगार पक्ष उरण पंचायत समिती माजी सभापती ऍड. सागर कडू यांच्या वाढ दिवसा निमित्त आई वडिलांच्या प्रित्यर्थ स्वखर्चा ने मुळेखंड येथे जेष्ठ नागरिकां साठी विरंगुळा केंद्र हॉल चे काम करण्यात आले आहे
: सदर अंगण वाडी चे उदघाटन शेतकरी कामगार पक्ष महिला आघाडी सौ सीमा घरत यांच्या हस्ते झाले. तर विरंगुळा हॉल चे उदघाटन शेतकरी कामगार पक्ष उरण तालुका चिटणीस मेघनाथ तांडेल यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष अरविंद घरत.. जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष व पदाधिकारी.मुळेखंड गावाचे आजी माजी अध्यक्ष.. ग्रामपंचायत सदस्य भालचंद्र म्हात्रे. कामगार नेते अनंत घरत. पंचायत समिती अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत