Header Ads

Header ADS

वीज वितरण कंपनीची वीज वाहिनी बेकायदेशीर सार्वजनिक बांधकाम उपविभाग सावदा यांचा आरोप

वीज वितरण कंपनीची वीज वाहिनी बेकायदेशीर सार्वजनिक बांधकाम उपविभाग सावदा यांचा आरोप


  वीज वितरण कंपनीची वीज वाहिनी बेकायदेशीर सार्वजनिक बांधकाम उपविभाग सावदा यांचा आरोप

लेवाजगत न्यूज सावदा - येथून जवळच असलेल्या सावखेडा येथे नवीन वीज उपकेंद्र मंजूर झाले आहे. त्यासाठी लागणारी वीज सावदा येथून  टाकली जात आहे.  सावदा ते खिरोदा व खिरोदा ते सावखेडा अशी सार्वजनिक बांधकाम विभाग यांचे हद्दीतून ही वीज वाहिनी जात असल्याने या वीज वाहिनीला सार्वजनिक बांधकाम विभागाने विरोध दर्शवला होता व आपले काम बेकायदेशीर असून आपल्या विभागाकडून सुरू असलेले आमच्या हद्दीतील काम हे तत्काळ बंद करावे अन्यथा आपल्या विषयी शासकीय नियमानप्रमाणे दंड आकारण्यात येईल अशा आशयाचे पत्र देखील सार्वजनिक बांधकाम उपविभाग सावदा यांनी १९/ ०९/२०२२ रोजी वीज वितरण कंपनी सावदा उपविभाग यांना दिले आहे. तरी देखील वीज वितरण कंपनीने सावदा सार्वजनिक बांधकाम उपविभाग यांच्या हद्दीत वीज वाहिनीचे पोल उभारले असून सावदा ते रोझोदा दरम्यान आमोदा भिकनगाव या महामार्गावर आठ ठिकाणी वीज वाहिनीची क्रॉसिंग केली आहे. त्यामुळे हे संपूर्ण काम बेकायदेशीर असल्याचा आरोपच सार्वजनिक बांधकाम उपविभाग सावदा यांनी पत्राद्वारे वीज वितरण कंपनीच्या उपविभागीय अधिकाऱ्याला कळवले होते .त्यामुळे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे अधिकारी कुणाच्या सांगण्यावरून एवढे बेकायदेशीर काम करीत आहे. असा प्रश्न ऐरणीवर आला असून या वीज वाहिनीला विविध स्तरातून आता विरोध होऊ लागला आहे.

वीज वितरण कंपनीची वीज वाहिनी बेकायदेशीर सार्वजनिक बांधकाम उपविभाग सावदा यांचा आरोप


आमोदा भिकनगाव या महामार्गावर वीज वाहिनीसाठी मोठ्या प्रमाणावर अवैध वृक्षतोड करण्यात आली  आहे व शासनाचा लाखो रुपयांचा महसूल महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी सार्वजनिक बांधकाम विभाग व वन विभाग या तिघा विभागांनी दुर्लक्ष केल्यामुळे बुडाला आहे .तरी या तिघं विभागाची विभागीय चौकशी करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते करीत आहेत.


आमोदा पाल भिकनगाव या हायब्रीड कम्युनिटी अंतर्गत नव्याने झालेल्या रस्त्यावरती वीज वितरण कंपनीची चक्क रोडला लागून उच्च दाब ३३केव्हीवीज वाहिनी टाकली असून यामुळे अपघात होऊन जीवित हानी वित्त आणि होण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे .वीज वितरण कंपनीच्या ठेकेदारांनी चक्क महामार्ग लगत नव्याने बांधकाम केलेल्या गटर मध्येच पोल उभारणी केलेली आहे. याकडे वीज वितरण कंपनी सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या आर्थिक हितसंबंधातून दुर्लक्ष करत आहे.


तसेच सावदा ते कोचुर या रोड दरम्यान २६ वीज वाहिनीचे नवीन पोल नव्याने लागवड केलेल्या वृक्षा ं वरतून लाईन टाकत आहे .दोन वर्षापासून काही वृक्षप्रेमी या झाडांचा संगोपन करून वाढवून पुन्हा वीज कंपनी त्या झाडांवरची कत्तल करणार हे वाढलेले झाड वीज लाईनीमध्ये अडथळा निर्माण करणारे असल्याने यांची तोड होणार असल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त होत आहे.


सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पोल उभारणी संदर्भात परवानगीसाठी पत्रव्यवहार केला होता परंतु त्यांनी पत्रव्यवहार हा ऑनलाइन करावा म्हणून आपल्याकडे पत्र दिले आहे. त्यांनी कारवाई संदर्भात पत्र पाच ते  दहा दिवसांपूर्वीच आम्हाला प्राप्त झाले आहे त्यानुसार मक्तेदाराला तात्पुरते काम स्थगित ठेवण्यासाठी सांगितले आहे

 राजेश नेमाडे

 कार्यकारी उपअभियंता वीज वितरण कंपनी सावदा उपविभाग



पोल उभारणी व वृक्षतोड संदर्भात अधिकार आमच्याकडे नसून मा. कार्यकारी अभियंता यांच्याकडे आहेत व त्या संदर्भात ऑनलाईन अर्ज करून परवानगी घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडे आम्ही पत्रव्यवहार केला होता त्या संदर्भात आम्ही त्यांना वेबसाईट सुद्धा उपलब्ध करून दिली होती परंतु अद्याप त्यांच्याकडे  पोल उभारणी व वृक्षतोडी संदर्भात कोणतीही परवानगी नसल्याने सदर काम बेकायदेशीर आहे.

सी. आर. चोपडेकर

उपविभागीय अधिकारी सार्वजनिक बांधकाम उपविभाग सावदा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.