श्री क्षेत्र सातपुडा निवासिनी मनुदेवी माता मंदिर मंगळवार रोजी ग्रहणामुळे असेल बंद
श्री क्षेत्र सातपुडा निवासिनी मनुदेवी माता मंदिर मंगळवार रोजी ग्रहणामुळे असेल बंद
लेवाजगत न्यूज यावल--मंगळवारी २५ रोजी खंडग्रास सूर्यग्रहण आहे. त्यामुळे श्री क्षेत्र सातपुडा निवासिनी मनुदेवीचे मंदिर ग्रहण काळात बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर संस्थानने घेतला आहे. त्यामुळे मंगळवारी 'भाविकांनी दर्शनासाठी येऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
मंगळवारी दुपारी सव्वातास हे सुर्यग्रहण राहणार आहे. सुर्यास्तापूर्वी होणाऱ्या या सुर्यग्रहणावेळी यावल तालुक्यातील आडगाव जवळील, मनुदेवीचे मंदिर बंद ठेवले जाणार आहे. मंदिर संस्थानतर्फे हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे मंगळवारी सुर्यग्रहण काळात भाविकांनी दर्शनासाठी येऊ नये असे आवाहन संस्थानचे अध्यक्ष शांताराम पाटील, उपाध्यक्ष शिवाजी पाटील, सचिव नीळकंठ चौधरी, विश्वस्त सोपान वाणी, भास्कर पाटील, चिंधू महाजन, सुनिल महाजन, भूषण चौधरी, योगेश पाटील, नितीन पाटील, सतिश पाटील, चंदन वाणी, ज्ञानेश्वर पाटील, महेंद्र पाटील, मंदिर व्यवस्थापक आर. के. पाटील यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत