Contact Banner

२ लाखांची लाच स्वीकारल्या प्रकरणी तहसीलदार सह एजंट वर कारवाई


 २ लाखांची लाच स्वीकारल्या प्रकरणी तहसीलदार सह एजंट वर कारवाई

लेवाजगत न्यूज नवी मुंबई- बक्षिसपत्र म्हणून दिलेल्या जमिनीच्या सात बारावर नाव नोंदवण्यासाठी लाच मागणाऱ्या तहसीलदारावर नवी मुंबई लाच लुचपत विभागाने कारवाई केली आहे. मध्यस्थी व्यक्ती (एजंट) मार्फत लाच स्विकारताना रंगेहात पकडण्यात आले आहे. सदर कारवाई नवी मुंबई लाच लुचपत विभागाने केली आहे यातील आरोपीचे नाव मिनल दळवी व राकेश चव्हाण असे आहे. यात दळवी या तहसील दार असून चव्हाण हे लाच स्विकारणारे मध्यस्थी आहेत.  या प्रकरणातील तक्रारदार यांच्या सासर्याच्या आईने सासाऱ्यांना जमीन बक्षीस म्हणून दिली होती. तसे बक्षिसपत्र होते मात्र सास र्‍या चे नाव जमिनीच्या सात बारा उताऱ्यावर नव्हते. 


या बाबत सासर्‍या च्या भावाने आक्षेप घेतला होता. तसे अपील ही केले होते.  याच जमिनीच्या सात बारा वर सासर्‍याचे नाव नोंदवण्यासाठी तहसीलदार यांना विनंती करण्यात आली होती. मात्र या अपील प्रकरणाचा निकाल तक्रारदार  यांच्या बाजूने लावण्यासाठी तहसीलदार यांनी ५ लाखांची लाच मध्यस्थी व्यक्ती चव्हाण यांच्या मार्फत मागितली. या बाबत २८ तारखेला तक्रारदार यांनी नवी मुंबई लाच लुचपत विभागाला तक्रार दिली होती. याची शहानिशा करण्यात आल्यावर सापळा लावून ही कारवाई शुक्रवारी रात्री साडे नऊच्या सुमारास ही करण्यात आली. 

 यात रुपये ५ लाख रुपयांची मागणी केली असली तरी  तडजोड अंती एकूण ३ लाख रुपये देण्याचे ठरले होते. त्यानुसार पहिला टप्पा म्हणून २ लाख रुपये देण्याचे ठरले होते त्यानुसार अलिबाग नगर पालिका इमारती समोर आर के इलेक्ट्रॉनिक दुकानात ही लाच मध्यस्थी चव्हाण याने स्विकारली आणि अलगद जाळ्यात अडकला. त्याला ताब्यात घेताच तहसीलदार दळवी यांनाही राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.