Contact Banner

साईभक्तांवर काळाचा घाला! शिर्डीला जातांना भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू


 साईभक्तांवर काळाचा घाला! शिर्डीला जातांना भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू

लेवाजगत न्युज:-येथील लोंढे गल्लीतील पाच मित्र सायकलवरून शिर्डीला साईदर्शनासाठी जात असताना पाथरे शिवारात पाठीमागून येणाऱ्या महिंद्रा कार (एमएच ४८ एके ६२८६) ने धडक दिली. या अपघातात दोन साईभक्तांचा जागीच मृत्यू झाला, तर तीन सायकलस्वार किरकोळ जखमी झाले आहेत. ही घटना शुक्रवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास घडली.

सिन्नर येथील पाच युवक शुक्रवारी (११ नोव्हेंबर) पहाटे सायकलवरून शिर्डीकडे साई दर्शनासाठी निघाले होते. मात्र शिर्डीला पोहचण्याअगोदरच त्यांच्यावर काळाने घाला घातला. पाचही सायकलस्वार रस्त्याच्या डाव्या बाजूने एका मागून एक असे चालत होते. पहाटे साडेसहाच्या सुमारास मुंबई, विरारहून शिर्डीकडे जाणाऱ्या कारने मागे असलेल्या दोन सायकलस्वरांना जोरदार धडक दिली. या अपघातात आदित्य महेंद्र मिठे (वय २३) व कृष्णा संतोष गोळेसर (वय १७) या दोघांचा मृत्यू झाला, तर आनंद दिगंबर गोळेसर (वय १६), ओम राजेंद्र गोळेसर (वय १६) व अमर विजय मिठे (वय १९) हे जखमी झाले आहेत. कृष्णा गोळेसर या तरुणावर दुपारी दीड वाजता, तर आदित्य मिठे यावर साडेतीन वाजता शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

अपघात झाला तेव्हा या धडकेचा आवाज ऐकून रस्त्याच्या कडेला राहणाऱ्या तरुणांनी घटनास्थळी धाव घेतली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन या युवकांनी पांगरी येथील रुग्णवाहिकेला बोलावून जखमींना सिन्नर येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.