जळगावात घरकाम करणाऱ्या ४८ वर्षीय महिलेवर बलात्कार
जळगावात घरकाम करणाऱ्या ४८ वर्षीय महिलेवर बलात्कार
लेवाजगत न्युज जळगाव : घरकाम करून संसाराचा रहाटगाडा हाकणाऱ्या ४८ वर्षीय महिलेवर जळगावात अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. पीडीत महिलेच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात प्रकाश पुंडलिक पाटील (पहूर, ता. जामनेर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठार मारण्याची धमकी
जळगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ४८ वर्षीय महिला घरकाम, धुणी, भांडी करण्याचे काम करते. १३ रोजी सायंकाळी ती घरात फरशी पुसत असताना संशयीत प्रकाश पुंडलिक पाटील (रा. पहूर) याने महिलेच्या घरात अनधिकृतपणे प्रवेश करीत महिलेचे तोंड दाबले व जिवंत ठार मारण्याची धमकी देत बळजबरीने अत्याचार केला. घडलेल्या प्रकाराबाबत कुणाला काही सांगितल्यास महिलेसह मुलाला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. पीडित महिलेने शनिवार, १९ रोजी एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिल्याने बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक निरीक्षक प्रमोद कठोरे करीत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत