फैजपूर महामार्ग वरील भाड्याने घेतलेले दुकान खाली करण्याचा वाद : एकावर विळ्याने वार !
फैजपूर महामार्ग वरील भाड्याने घेतलेले दुकान खाली करण्याचा वाद : एकावर विळ्याने वार !
प्रतिनिधी सावदा- भाड्याने घेतलेले दुकान खाली करण्याबाबत विचारणा केली असता एकावर विळ्याने वार करण्यात आल्याची धक्कादायक सावदा येथे सोमवार संध्याकाळी घटना घडली आहे.
या संदर्भातील माहिती अशी की,फैजपूर येथील हरेश उर्फ रामा सुभाष होले यांच्या काकांचे दुकान हे किरण प्रभाकर निंबाळे आणि आनंद रवींद्र जगताप या दोघांनी भाड्याने घेतलेले आहेत. हे दुकान ते खाली करत नसल्याने रामा होले यांनी त्यांना याबाबत विचारणा केली. यामुळे किरण निंबाळे यांनी रिक्षातून विळा आणून त्यांच्यावर वार केला. तर आनंद जगताप यांनी त्यांना पकडून ठेवले. या झटापटीत रामा होले यांच्या मनगटाला विळ्याच्या वारामुळे जखम झाली.
ही घटना सावदा फैजपूर महामार्ग वर असलेल्या सर्वज्ञ फर्निचर या दुकानाच्या समोर सायंकाळी साडेसहाच्या सुमारास सुमारास घडली. या अनुषंगाने हरेश उर्फ रामा सुभाष होले (वय ४५, रा. लक्कडपेठ, फैजपूर ) यांनी सावदा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. यानुसार गुरनं २२४/२०२२ भादंवि कलम ३२६, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत