Header Ads

Header ADS

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या तालुका प्रमुखावर हल्ला

शिवसेना ठाकरे गटाच्या तालुका प्रमुखावर हल्ला


 शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या तालुका प्रमुखावर हल्ला

लेवाजगत न्यूज बुलढाणा-शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या मोताळा तालुका प्रमुखावर अज्ञात आरोपींनी जीवघेणा हल्ला केला. 

    ही खळबळजनक घटना आज, मंगळवारी बुलढाणा-मोताळा मार्गावरील मूर्ती फाट्यावर दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली.या हल्ल्यात तालुका प्रमुख अनंता दिवाणे (४५,रा. शिरवा, ता.मोताळा) व युवासेना उपजिल्हाप्रमुख शुभम घोंगटे (२५) हे गंभीर जखमी झाले आहेत. अनंता दिवाणे व शुभम घोंगटे हे बुलढाणा येथे पक्षाच्या बैठकीसाठी आले होते. २६ नोव्हेंबरला उद्धव ठाकरे यांची चिखली येथे सभा होणार आहे, या सभेच्या नियोजनाची बैठक जांभरून रोडवरील जनशिक्षण संस्थेत संपन्न झाली. बैठक आटोपून दोघे दुचाकीने मोताळ्याकडे जात होते. दरम्यान, मूर्ती फाट्याजवळ बुलढाण्याकडून आलेल्या चारचाकीने दोघांना अडवले. मोटारीतून उतरलेल्या अज्ञात चार हल्लेखोरांनी तोंडावर रुमाल बांधलेला होता. त्यांनी दोघांना लोखंडी रॉडने जबर मारहाण केली.

       अचानक झालेल्या या हल्याने भांबावलेले दोघेही बाजूच्या शेतांमध्ये पळाले. या प्रकारानंतर हल्लेखोर पसार झाले. स्थानिकांनी दोघांनाही जिल्हा रुग्णालयात दाखल केले. या घटनेने एकच खळबळ उडाली असून तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम यांनी जिल्हा रुग्णालयाला भेट दिली. जिल्हा रुग्णालय परिसरात सध्या पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.