जिल्हा दूध संघ-खडसे वगळता १८ नेत्यांना बजावली नोटीस
जिल्हा दूध संघ-खडसे वगळता १८नेत्यांना बजावली नोटीस
वृत्तसंस्था जळगाव -जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत उमेदवार आणि मतदार असलेल्या १८ राजकीय लाेकांना उच्च न्यायालयातून नाेटीस आल्या आहेत. आसाेदा येथील खेमचंद महाजन यांनी या राजकारण्यांवर घेतलेली हरकत फेटाळण्यात आल्यानंतर त्यांनी न्यायालयात धाव घेतली हाेती. या नाेटीस सर्वच पक्षातील नेत्यांना प्राप्त झालेल्या असल्या तरी राष्ट्रवादीत मात्र या नाेटीसमुळे खळबळ उडाली आहे.
जिल्ह्यातील मंत्री, आमदारांनाही दूध संस्थेसारख्या छाेट्या संस्थेत देखील जायचेच आहे. तेथील ७० एकर जमिनीवर त्यांचा डाेळा असल्याचा आराेप आमदार एकनाथ खडसे यांनी केला हाेता. नाेटीस मिळालेल्या १८ जणांच्या यादीत जिल्ह्यातील दाेन्ही मंत्र्यांसह भाजप, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी या तीनही पक्षांचे राजकीय पदाधिकारी देखील आहेत. यात १८ जणांच्या यादीत सर्वाधिक ८ जण हे राष्ट्रवादीचे असून सर्वच उमेदवार आहेत. खेमचंद महाजन यांनी आमदार मंगेश चव्हाण यांच्यावर देखील हरकत घेतली हाेती. ही हरकत आणि त्यावर न्यायालयात दाखल केलेली याचिका फेटाळण्यात आली आहे. परंतु मतदार यादीवरील हरकत मात्र कायम आहे.
या राजकारण्यांवर घेतली हरकत
भाजप : मंत्री गिरीश महाजन, आमदार मंगेश चव्हाण, आमदार संजय सावकारे, माजी आमदार स्मिता वाघ, भैरवी पलांडे. शिवसेना (ठाकरे गट) : जयश्री महाजन, मालतीबाई महाजन. शिवसेना (शिंदे गट) : मंत्री गुलाबराव पाटील, आमदार चिमणराव पाटील, आमदार किशाेर पाटील. राष्ट्रवादी : आमदार अनिल पाटील, डाॅ. सतीश पाटील, अॅड. वसंतराव माेरे, संजय पवार, छाया देवकर, साेनल पवार, जयश्री पाटील, पराग माेरे.
काय हाेता आक्षेप?
दूध संघाच्या निवडणुकीसाठी आवश्यक असलेली मतदार यादी तयार करताना आमदार आणि राजकीय पदाधिकाऱ्यांनी दुसऱ्या गावांत खाेटे ठराव केले आहेत. ते लाेक त्या गावांत राहत असल्याचे काेणतेही पुरावे नसल्याने त्यांचे मतदार यादीतील नाव रद्द करण्याची मागणी खेमचंद महाजन यांनी केली हाेती. सहकार विभागाने त्यांची याचिका फेटाळल्यानंतर त्यांनी आैरंगाबाद खंडपीठात धाव घेतली आहे. उच्च न्यायालयाने ही याचिका दाखल करून घेत सर्व संबंधितांना याप्रकरणी नाेटीस बजावल्या आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत