Header Ads

Header ADS

“बाप मंत्रालयात आहे आणि पोरगी तमाशात…” मेघा घाडगेने सांगितला हृदयद्रावक प्रसंग

 

“Father-is-in-the-ministry-and-megha-ghadge-tells-a-heart-breaking-scene-in-the-boy-show.

“बाप मंत्रालयात आहे आणि पोरगी तमाशात…” मेघा घाडगेने सांगितला हृदयद्रावक प्रसंग

 वृत्तसंस्था मनोरंजन-प्रसिद्ध नृत्यांगना आणि मराठी चित्रपट अभिनेत्री मेघा घाडगे ही कायमच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी ती बिग बॉस मराठीच्या कार्यक्रमात सहभागी झाली. यावेळी तिने तिच्या आयुष्यात घडलेल्या प्रसंगाबद्दल सांगितले. यादरम्यान ती भावूक झाल्याचे पाहायला मिळाली. 

    मेघा घाडगेने नुकतंच एका वृत्तपत्राला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने तिच्या लहानपणीच्या आठवणी विचारल्या. त्यावर तिने तिच्या मुंबईतील बालपणीच्या आठवणी, नाटकांच्या स्पर्धा, नाचायला केलेली सुरुवात याबद्दल भाष्य केले. आणखी वाचा : “ब्लाऊजचा गळा, कमरेखाली साडी अन् अंगविक्षेप…” मेघा घाडगेचा गौतमी पाटीलवर पुन्हा एकदा हल्लाबोल


मेघा घाडगे काय म्हणाली? 

    “मी क्रॉफर्ड मार्केटच्या ज्या चाळीत राहायचे आजही माझं घर तिथे आहे. पण आमचं अजूनही त्या परिसरात येणं जाणं कायम असायचं. ती आयुष्यभरासाठीची अटॅचमेंट झाली आहे. बीएमसी क्वॉटर्स ही कलाकारांची खाण आहे. फक्त कॉफर्ड मार्केट नाही तर सर्व बीडीडी चाळी, क्वॉटर्स या संपूर्ण तिथे कलाकाराचा जन्म झाला आहे. खूप कलावंत आहेत, जे आजही सिनेसृष्टीत आहेत. त्यात दरवर्षी नाटकाच्या स्पर्धा, एकांकिका, लोककलच्या स्पर्धा व्हायच्या. मी या प्रत्येक स्पर्धेत असायचे. मी वयाच्या ८ व्या ९ व्या वर्षी एका एकांकिका स्पर्धेत म्हातारीचा रोल केला होता. त्याला मला उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री असा पुरस्कार मिळाला होता.


मी मधू कांबीकर यांच्याबरोबर डोंबारी नावाचा चित्रपट केला. त्यात मला त्यांच्याकडून फार गोष्टी शिकायला मिळाला. त्यांचा सखी माझी लावणी हा पारंपारिक कार्यक्रम होता. त्यात फक्त पारंपारिक लावण्यांचा होता. त्यावेळी वन्स मोअर व्हायरचं नाही. त्यांनी त्याची एक विशिष्ट पद्धत केली होती. त्यांचा छान पेहरावही असायचा. मी अनेक कलावंतांना समोरुन पाहिलं आहे, असे तिने सांगितले.

   मी स्वत:ला नशिबवान समजते की मला त्यांच्याकडून खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. मी त्याचे काही प्रशिक्षण घेतले नाही. त्यांच्याकडून एका खानदानी उपजात लोककला होता. माझ्याकडे मी माझ्या घरातील पहिलीच मुलगी असेल जी लावणी क्षेत्राशी जोडली गेली असेल. माझे बाबा नाटकात काम करायचे, आजोबा कव्वाली गायचे. त्यांची गाणी आजही प्रसिद्ध आहेत. बाबांना अभिनयात काम करताना पाहिल्यामुळे मुळातच त्यांच्याकडून अभिनय आला.

     माझं काही बॅकग्राऊंड नाही. पण मी या गोष्टीसाठी फार चांगल्याप्रकारे काही जोडली गेले ज्या गोष्टीसाठी मला नाव ठेवली गेली. माझ्या वडिलांना खूप हिणवलं गेलं. मुलगी तमाशात नाचते आणि बाप मंत्रालयात ऑफिसर आहे, हे काय तमाशात नाचवतो पोरीला अशा घाणेरड्या पातळीवर त्यांना बोललं गेलं. पण मी ठरवलं होतं की ज्या गोष्टीत माझं नाव बदनाम केलं आहे. त्याच गोष्टीत मी माझं नाव कमावणार. त्याच कलेत नाव मिळवणार. ते मी ठामपणे कोणाचीही साथ नसताना केले आणि आज मी इथे आहे, असेही ती म्हणाली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.