सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘शेअर मार्केट टीप्स’ देणाऱ्यांवर आता ‘सेबी’ची नजर; लवकरच येणार मार्गदर्शक सुचना
सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘शेअर मार्केट टीप्स’ देणाऱ्यांवर आता ‘सेबी’ची नजर; लवकरच येणार मार्गदर्शक सुचना
वृत्तसंस्था अर्थ-एकाच वेळी अनेकांशी संवाद साधण्यासाठी आणि संदेशांची देवाण-घेवाण करण्यासाठी सध्या सोशल मीडिया हे सर्वात मोठं माध्यम आहे. याच सोशल मीडियाचा वापर करत आजकाल अनेक जण शेअर मार्केटमध्ये आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी टीप्स देत असतात. मात्र, अशा टीप्समुळे अनेकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले. असा घटनांना आळा घालण्यासाठी सिक्युरिटीज एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाकडून (SEBI ) लवकरच मार्गदर्शक सुचना तयार करण्यात येणार आहे. सेबीचे सदस्य एसके मोहंती यांनी मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात यासंदर्भात माहिती दिली आहे.
करोनानंतर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्याप्रमाणे गुंतवणूक सल्लागारांची संख्याही मोठ्या वाढते आहे. अनेक गुंतवणूक सल्लागार युट्यूब आणि इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासंदर्भात सल्ला देत असतात. गेल्या काही वर्षात अशा गुंतवणूक सल्लागारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कोणतीही अधिकृत परवानगी नसताना ते सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांना गुंतवणुकीबाबत सल्ले देत असतात, त्यामुळे अनेकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागते, अशा घटना रोखण्यासाठी आता सेबीकडू प्रयत्न केले जाणार आहे.
सेबीच्या नियमांनुसार गुंतवणूक सल्लागार म्हणून काम करताना सर्वप्रथम सेबीकडे स्वतःची नोंदणी करावी लागते. सद्यस्थितीत देशात एक हजार जास्त आर्थिक सल्लागार आहेत. गुंतवणूक सल्लागारांच्या वाढत्या संख्येमुळे सेबीचीही चिंता वाढली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत