Header Ads

Header ADS

सासुरवाडीत मटणाच्या सूप मध्ये भात कसा काय आला म्हणून एकाची हत्या

सासुरवाडीत मटणाच्या सूप मध्ये भात कसा काय आला म्हणून एकाची हत्या

सासुरवाडीत मटणाच्या सूप मध्ये भात कसा काय आला म्हणून एकाची हत्या

पिंपरी चिंचवड/पुणे प्रतिनिधी  - सध्या राज्यात क्षुल्लक कारणावरून मारहाण, हत्या अश्या प्रकरणात सतत वाढ होत आहे, लहानश्या वादातून हत्या होणे ही आता काही नवी बाब राहली नाही.


अशीच एक घटना पिंपरी चिंचवड येथील पिंपळे सौदागर भागात घडली. 


सासुरवाडी खानावळ मध्ये जेवायला आलेल्या दोन तरुणांनी मटणाच्या सूप मध्ये भात कसा आला, यावरून खानावळीच्या वेटर सोबत वाद घातला, त्यानंतर वाद मारहाणीत रूपांतरित झाला, या मारहाणीत वेटर ची दोघांनी मिळून हत्या करीत तिथून पळ काढला. 


मंगेश संजय पोस्ते असे मृत वेटरचे नाव आहे, मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास अमित मुठकुळे व सचिन भवर हे जेवणासाठी आले होते, मटणाच्या सुपमध्ये भात कसा काय आला? यावरून दोघांनी वेटर मंगेश सोबत वाद घातला, लाकडी दांडका हातात घेत वेटर मंगेश ला मारहाण केली.


यामध्ये वेटर मंगेश चा मृत्यू झाला, पोलिसांनी दोन्ही आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे. हत्येची ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.