Header Ads

Header ADS

मोदी सरकारचा मोठा निर्णय! फोन आल्यावर आता Unknown Number नाही थेट फोन करणाऱ्याचं नाव दिसणार

 

Modi-Government's-big-decision- When-phone-call-now-Unknown-Number-not-directly-the-caller-name-will-be-appeared

मोदी सरकारचा मोठा निर्णय! फोन आल्यावर आता Unknown Number नाही थेट फोन करणाऱ्याचं नाव दिसणार

वृत्तसंस्था नवी दिल्ली-भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच ट्रायकडून (TRAI) आता लवकरच एक महत्वाची सेवा सुरु केली जाणार आहे. त्याद्वारे तुमची अनोळखी मोबाईल नंबरपासून सुटका होणार आहे. आपल्यापैकी प्रत्येकाला अनेक वेळा अनोळखी नंबरवरुन आलेले कॉल उचलण्याचा कंटाळा येतो.


तर काहीना अनोळखी नंबरची भीती देखील वाटते. मात्र, आता सरकारकडून एक अशी सुविधा अमंलात आणली जाणार आहे. त्यामुळे तुमची अनोळखी नंबरपासून सुटका होणार आहे. कारण, आता जो व्यक्ती तुम्हाला कॉल करेल त्याचं नाव मोबाईल फोनमध्ये सेव केलेलं नसले तरीही ते तुम्हाला दिसणार आहे.

   या योजनेअंतर्गत आता जर एखाद्या व्यक्तीला नवीन सिमकार्ड घ्यायचे असेल तर त्यासाठी भरण्यात येणारा केवायसी (KYC) फॉर्मवर त्याला स्वत:ची सर्व खरी माहिती भरावी लागेल. शिवाय त्या फॉर्मवर सिम कार्ड वापरकर्त्याचे जे नाव असेल तेच नाव त्या व्यक्तीने इतरांना कॉल केल्यावर दिसणार आहे. ट्रायच्या या उपक्रमामुळे अनेक जणांची अनोळखी नंबरमुळे होणाऱ्या त्रासापासून सुटका होणार आहे.


आता मिळणार १०० टक्के खरी माहीती –


अनोळखी नंबरवरुन आलेल्या कॉलमुळे अनेक लोकांची आर्थिक फसवणूक झाल्याची उदाहरणं आपण पाहिली आहेत. त्यामुळे आता अनोळखी नंबरवरुन लोकांची फसवणूक करणाऱ्यांवर काही प्रमाणाक आळा बसणार आहे. दरम्यान, सध्या देखील आपल्याला अनोळखी नंबर कोणाचा आहे हे पाहता येतं. त्यासाठी आपण Truecaller सारख्या अ‍ॅप्सचा वापर देखील करतो. मात्र Truecaller सारखी अ‍ॅप्स तुमच्या मोबाईलमधील डाटा विकण्याची शक्यता असते.

    शिवाय आजकाल ही अ‍ॅप्स तुमच्याकडून ते देत असलेल्या सेवेचे मुल्य देखील आकारतात. तर या अ‍ॅप्सद्वारे मिळणारी माहिती देखील पुर्णपणे खरी असेल असा दावा करता येत नाही. त्यामुळे आपली काही प्रमाणात फसवणूक होण्याची शक्यता असतेच. मात्र, सध्या ट्रायद्वारे केवायसी आधारित जी सेवा सुरू करण्यात येणार आहे त्याद्वारे ग्राहकांना १०० टक्के अचूक माहिती मिळणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.