Header Ads

Header ADS

चेन्नईत प्रेयसीच्या मुलीची हत्या करुन मृतदेहावर केला बलात्कार; आरोपी प्रियकराला विरारमधून अटक

In Chennai-boyfriend-accused-of-rape-arrested-from-Virar after-murdering-girlfriend-daughter-


चेन्नईत प्रेयसीच्या मुलीची हत्या करुन मृतदेहावर केला बलात्कार; आरोपी प्रियकराला विरारमधून अटक

वृत्तसंस्था विरार-मागील आठवड्याच शनिवारी चेन्नई येथे एका १८ वर्षीय तरुणाची हत्या करून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली होती. हत्येनंतर फरार झालेल्या तिच्या आईच्या प्रियकराला शक्रवारी विरार पोलिसांनी अटक करून चेन्नई पोलिसांच्या ताब्यात दिले होते. सदरचा आरोपी हा विरार फुलपाडा परीसरात राहत असून बिगारी काम करत होता. राजू मणी नायर असे आपोरीचे नाव असून तो चेन्नईतून हत्या करून विरारला पळून आला होता.

   चेन्नईतील पूनमल्ली परिसरात राहणाऱ्या एका महिलेचे आपल्या पतीशी संबध खराब झाल्याने प्रियकर राजू मणी नायर याच्याकडे रहायला आली होती. आरोपी राजू मणी नायर याने आपल्या मुलीचा सांभाळ करणार असल्याची कबूली दिल्याने ती त्याच्याकडे राहायला आली होती. पण आरोपी राजू याने १२ नोव्हेंबर रोजी तरूणीची आई घरी नसताना तिची गळा दाबला, आणि तीच्या मृतदेहावर बलात्कार केला. जेव्हा मुलीची आई घरी आली तेव्हा घराला बाहेरून कुलूप लावले होते. तीने चावीने दरवाजा उघडला आणि तीची मुलगी बेशुद्ध अवस्थेत पडली होती. तिच्या मानेभोवती खुणा होत्या आणि ती श्वास घेत नव्हती. नंतर जेव्हा आईने शेजाऱ्यांना विचारले असता, शेजाऱ्यांनी सांगितले की राजू दार लावून घाईघाईने निघून गेला.

     यामुळे आईने पूनमल्ली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली पूनमल्ली पोलिस (कायदा आणि सुव्यवस्था) चे निरीक्षक पीआर चिदंबरमुरुगेसन यांनी सांगितले, “फॉरेन्सिक टीमने मला तोंडी सांगितले की मारेकऱ्याने मुलीच्या शरीराशी शारीरिक संबंध ठेवले होते. या खुलाशानंतर, पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ (हत्या) आणि ३८० (चोरी) अंतर्गत यापूर्वी नोंदलेल्या गुन्ह्यामध्ये बलात्काराचे आरोप जोडले. त्यानंतर त्यांनी विरार पोलिसांना आरोपीची माहिती दिली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी चेन्नई पोलिसांना आरोपींना पकडण्यात मदत केली.

    पोलिस सूत्रांनी सांगितले की, गुन्हा केल्यानंतर नायर हा विरार येथे पत्नीकडे आला होता. पळून जाताना त्याने मयताचे आणि तिच्या आईचे मोबाईल घेतले होते. त्याने आपला फोन बंद ठेवला होता, तरी त्याने चोरीला गेलेला एक फोन चालू केला होता. त्यावरून आरोपी विरारला असल्याचे समजले आणि त्याला अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.