कोचूर-सावदा शिवारात मोरांची शिकार झाल्याची चर्चा तपास गरजेचा
(काल्पनिक चित्र)
कोचूर-सावदा शिवारात मोरांची शिकार झाल्याची चर्चा तपास गरजेचा
लेवाजगत न्यूज सावदा-कोचूर, सावदा व फैजपूर या तीन गावांच्या सीमावर्ती भागातील शिवारात पाताळगंगा नाल्यावर अनेक दिवसांपासून मोरांचा अधिवास आहे. मात्र, गेल्या चार-पाच दिवसांपासून मोर दिसेनासे झाल्याने त्यांची शिकार झाल्याची शंका शेतकऱ्यांनी व्यक्त केली. कारण, काही दिवसांपूर्वी या भागात बंदूकधारी शिकाऱ्यांचा वावर आढळला होता.
या शिकाऱ्यांना काही शेतकऱ्यांनी हटकले असता आम्ही तितूर पकडण्यासाठी आलो आहोत, अशी उत्तरे मिळाली. मात्र, चार-पाच दिवस आधी सायंकाळी ४ ते ५ वाजेदरम्यान या परिसरात गोळीबारासारखा आवाज झाला. तसेच मोर व लांडोर यांचा मोठमोठ्याने ओरडण्याचा आवाज शेतकऱ्यांच्या कानावर पडला. यानंतर या भागातील मोर देखील दिसेनासे झाले आहेत. तसेच एका मजूर महिलेला २५ ते ३० मोराची पिसे एका झाडाखाली आढळली. त्यामुळे मोरांची शिकार झाल्याची शंका अधिकच बळावली. वन विभागाने या प्रकरणाचा तपास करून त्यातील सत्यता समोर आणावी अशी मागणी आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत