Header Ads

Header ADS

पोलिस निरीक्षकाची आत्महत्या

 

पोलिस निरीक्षकाची आत्महत्या प्रवीण कदम

पोलिस निरीक्षकाची आत्महत्या

  लेवाजगत न्यूज धुळे-   पोलिस प्रशिक्षण केंद्रात तीन वर्षांपासून कार्यरत असलेले पोलिस निरीक्षक प्रवीण कदम यांनी गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी सायंकाळी उघडकीस आली. विशेष म्हणजे कदम यांनी सकाळी ७ वाजून ७ मिनिटांनी कुटुंबीय, नातलगांच्या सोशल मीडिया ग्रुपवर गुड मॉर्निंगचा मेसेज टाकला होता. त्यानंतर दिवसभर ते खोलीतून बाहेर आले नाही. त्यांच्याजवळ आढळलेल्या चिठ्ठीत अपघाताच्या गुन्ह्यातील चुकीचा तपास कारणीभूत ठरल्याचा आशय आहे. शिवाय आत्महत्येबद्दल कोणाला जबाबदार धरू नये असेही नमूद आहे.

     प्रवीण कदम यांच्याकडे खानावळची जबाबदारी होती. त्यांची इतरत्र बदली होण्याची शक्यता होती. प्रशिक्षण केंद्रातील सह्याद्री इमारतीच्या फ्लॅट नं. २ मध्ये ते एकटे राहत होते. सायंकाळी एक कर्मचारी त्यांच्या खोलीत गेल्यावर घटना उघडकीस आली. त्यांच्याजवळ दोन ओळींची चिठ्ठी मिळाली आहे. त्यात आत्महत्येला मीच जबाबदार आहे. कोणाला कारणीभूत धरू नये, असे नमूद आहे. शिवाय एका अपघाताच्या गुन्ह्याचा चुकीचा झालेला तपास कारणीभूत असल्याचे नमूद आहे.

     दोन वर्षांपूर्वी कदम यांचे शालक यांचा अपघाती मृत्यू झाला होता. शिवाय मोठ्या बहिणीच्या पतीचे गेल्यावर्षी निधन झाले. वयोमानामुळे त्यांच्या वडिलांना पक्षाघात झाला. त्यांना सतत दुःखाला सामोरे जावे लागत होते. यातही आपल्या वडिलांनी संचित केलेले आपल्यावर खर्च झाल्याचे त्यांना नैराश्य होते. त्यातून त्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेनंतर त्यांचे कुटुंबीय शहराकडे येण्यास निघाले. कदम यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई, वडील, दोन बहिणी असा परिवार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.