Header Ads

Header ADS

शवविच्छेदन अहवालाने फुटले बिंग: पत्नीने रोजच्या भांडणाला वैतागून पतीला गळफास देत आत्महत्येचा केला बनाव

 

Post-mortem-report-breaks-Bing-wife-hangs-her-husband-feigns-suicide after getting fed up with daily quarrels


शवविच्छेदन अहवालाने फुटले बिंग:

पत्नीने रोजच्या भांडणाला वैतागून पतीला गळफास देत आत्महत्येचा केला बनाव

वृत्तसंस्था परळी- दारू पिऊन घरी आलेल्या पतीशी झालेल्या भांडणानंतर वैतागलेल्या पत्नीने दोरीने गळा आवळून पतीचा खून केला. त्यानंतर पतीनेच गळफास घेतल्याचा कांगावा केल्याची घटना परळी तालुक्यातील गोवर्धन हिवरा येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी परळी तालुक्यातील सिरसाळा पोलिस ठाण्यात तपास करणाऱ्या पोलिसाने दिलेल्या तक्रारीनुसार पत्नीवर खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला. हनुमान ऊर्फ राजाभाऊ अशोक काकडे (३०, रा. हिवरा, ता. परळी) असे मृत पतीचे नाव आहे.


पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती खुद्द पत्नीनेच सिरसाळा पोलिसांना दिली होती. या माहितीवरून सिरसाळा ठाण्याचे पोलिस बुऱ्हाण नसीर, शेनकुडे, राऊत, भडंगे घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी पोहोचले. तेव्हा हनुमान पलंगावर पडल्याचे त्यांना दिसून आले. इतर नातेवाइकांच्या मदतीने पोलिसांनी हनुमानला प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. त्यानंतर त्यास परळी येथे हलवण्यात आले. परळीच्या शासकीय रुग्णालयात डॉक्टरांनी हनुमानला तपासून मृत घोषित केले. या खून प्रकरणाचा तपास एपीआय एकशिंगे, पीएसआय शेळके हे करत आहेत.

    या घटनेनंतर परळीच्या उपजिल्हा रुग्णालयात हनुमानच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली. शवविच्छेदन अहवालात हनुमानचा गळा दाबल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. पत्नी वैष्णवी काकडेवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, हनुमानचे वडील अशोक काकडे हे अपंग असून त्याची आई प्रभावती काकडे यांचा एक वर्षापूर्वी मृत्यू झाला होता. हनुमानला एक अपत्य असल्याची माहिती देण्यात आली आहे.

     खुनानंतर सुताची दोरी छताच्या हुकाला अडकवली

परळी तालुक्यातील हिवरा येथील हनुमान काकडे शुक्रवारी (११ नोव्हेंबर) रात्री दारू पिऊन घरी आला हाेता. पत्नी वैष्णवीबरोबर त्याचे भांडण झाले. त्यानंतर वैष्णवीने खोलीचा दरवाजा लावून घेतला आणि रात्री १ वाजता दोरीने पती हनुमानचा गळा आवळला. पतीचा खून केल्यानंतर वैष्णवीने सुताची दोरी छताच्या हुकला अडकवली. खुनाचा ही घटना लपवण्यासाठी घराचा दरवाजा उघडून हनुमानने सुताच्या दोरीने छताला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा कांगावा केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.