Header Ads

Header ADS

रविंद्र भोळे महाराज ह्यांचे विविधांगी निष्काम कार्य प्रेरणादायी- स्वामी दिव्यानंद गीरी महाराज

रविंद्र भोळे महाराज ह्यांचे विविधांगी निष्काम कार्य प्रेरणादायी- स्वामी दिव्यानंद गीरी महाराज


रविंद्र भोळे महाराज ह्यांचे विविधांगी निष्काम कार्य प्रेरणादायी- स्वामी दिव्यानंद गीरी महाराज

लेवाजगत न्यूज उरुळीकांचन ता. हवेली पुणे: अध्यात्मिक कार्ये करुन अत्मस्वरूपाशी एकरूपता साधून व समाजाप्रती एकरूपता साधण्याचे म्हणजे समाजसेवेचे महान कार्य निरंतरपणे डॉ रविंद्र भोळे महाराज करीत आहेत. तसेच आत्मोउध्दाराची प्रेरणाही प्रवचना द्वारे अनेक दशके देत आहेत. आसक्ती न धरता विविध क्षेत्रांतील निरपेक्ष, समर्पित भावनेने  समाजासाठी व राष्ट्रहितासाठी केलेले निष्काम कार्य प्रेरणादायी असुन डॉ रविंद्र भोळे महाराज ह्यांचे निष्काम कर्मयोग कार्य प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन स्वामी दिव्यानंद गिरी महाराज ह्यांनी येथे व्यक्त केले. स्वामी दिव्यानंद गिरी हे श्रीपंचदशनाम आखाडा गुरू स्वामी मोहिनीगिरी उर्फ संत जनार्दन स्वामी यांचे शिष्य अनुग्रही आहेत. येथे रविंद्र शांतीनिकेतन ग्रंथालयाला स्वामी राम शुकदाश लिखित श्रीमद् भगवद्गीता ग्रंथ प्रदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम रविंद्र शांतीनिकेतन ग्रंथालयात आयोजित करण्यात आला होता. ह्या वेळी मार्गदर्शन करताना स्वामी पुढे म्हणाले की न्यास, ध्यान, नाम, क्रिया करीत असताना समाजाचे, राष्ट्राचे ऋण फेडण्यासाठी कार्य करणे प्रेरणादायी असते. रविंद्र शांतीनिकेतन ग्रंथालयात खूप अध्यात्मिक ग्रंथ पुस्तके आहेत, ते वाचकांना मोफत वाचनासाठी दिले जातात,हे कार्य सांस्कृतिक, अध्यात्मिक वारसा टिकविण्यासाठी महत्वपूर्ण आहे. डॉ रविंद्र भोळे महाराज ह्यांचे हे ग्रंथालयातील धार्मिक, अध्यात्मिक ग्रंथ हि अमूल्य ठेव आहे . ह्या कार्यक्रमात अमोल भोसले प्रयागधाम शाळा समितीचे पदाधिकारी, पत्रकार केसरी, हवेली महानुभाव पंथाचे अध्यक्ष नंदकुमार मुरुकुटे, अखील पुणे जिल्हा मराठा महासंघाचे पदाधिकारी सुनील तुपे , सौ संगीता रविंद्र भोळे  संचालक अस्मिता नागरी सहकारी पतसंस्था , रविन्द्र शांतीनिकेतन ट्रस्टी सौ रश्मी देशमुख, डॉ अपूर्वा भोळे सहितअनेक मान्यवर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.