Header Ads

Header ADS

फैजपूर येथील लक्ष्मी नागरी पतसंस्थेत सहकार पॅनलला बहुमत

 

फैजपूर येथील लक्ष्मी नागरी पतसंस्थेत सहकार पॅनलला बहुमत

फैजपूर येथील लक्ष्मी नागरी पतसंस्थेत सहकार पॅनलला बहुमत

लेवाजगत न्यूज फैजपूर-येथील लक्ष्मी नागरी पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत नरेंद्र नारखेडे यांच्या सहकार पॅनलला बहुमत मिळाले.

    पतसंस्थेची संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक रविवारी सकाळी घेण्यात आली. मतदान आठ ते चार या वेळेत झाले. त्यानंतर ४ वाजेपासून मतमोजणीला प्रारंभ करण्यात आला. एकूण ८७३ मतदार होते, त्यापैकी ४४५ जणांनी मतदान केले. या निवडणुकीत नरेंद्र नारखेडे यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या सहकार पॅनलला मतदारांनी स्पष्ट बहुमत दिले आहे. 

  जनरल जागेसाठी सहा जागा निवडून घ्यायचा होत्या त्यात सात उमेदवार उभे होते. यात विद्यमान चेअरमन नरेंद्र नारखेडे (४२१) यांच्यासह मनोजकुमार पाटील (४१६), अनिल नारखेडे (४२५), नीळकंठ सराफ (४९३), डॉ.गणेश चौधरी (३९८), प्राचार्य रवींद्र चौधरी (४१७) हे उमेदवार विजयी झाले. ओबीसीमधून एक जागा निवडून द्यायची होती. यात दोन उमेदवार उभे होते. त्यापैकी आप्पा भालचंद्र चौधरी (४१६) हे उमेदवार विजयी झालेआहे. तर उमाकांत पाटील (२१), जयप्रकाश चौधरी (३८) हे उमेदवार पराभूत झाले. महिलांच्या दोन जागा बिनविरोध झाल्या. यात लतिका भास्कर बोंडे, रेवती चोलदास पाटील यांचा समावेश आहे. न्हावी दरवाजाजवळील मराठी शाळेमध्ये मतदान झाले. निवडणूक निर्णय अधिकारी आर.डी. राऊत, सहाय्यक निवडणूक अधिकारी एम.पी. भारंबे, केंद्रप्रमुख डी.जे.तडवी, मतदान अधिकारी डी. के. भारंबे, सतीश भंगाळे, प्रकाश झोपे, अंबादास मराठे, भागवत सपकाळे, विशाल भिरूड यांनी कामकाज पाहिले. संस्थेच्या कर्मचारी जयश्री चौधरी, राजेंद्र मानेकर, चंद्रकांत पाटील, राजेंद्र मिस्त्री यांनी सहकार्य केले. विजयी उमेदवारांचे सिद्धेश्वर वाघुळदे यांनी अभिनंदन  केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.