समरसता महाकुंभ भुसावळ यावल रावेर, बऱ्हाणपूर जळगाव चोपडा अमळनेर या तालुक्यातील प्रत्येक गावात घरोघरी कार्यक्रम पत्रिकांचे वाटप
समरसता महाकुंभ भुसावळ यावल रावेर, बऱ्हाणपूर जळगाव चोपडा अमळनेर या तालुक्यातील प्रत्येक गावात घरोघरी कार्यक्रम पत्रिकांचे वाटप
निष्कलंकिधाम वढोदे - महामंडलेश्वर जनार्दन हरी जी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली निष्कलंकधाम वढोदा या ठिकाणी दिनांक २९ ते ३१ समरसता महाकुंभचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी संतांची उपस्थिती व कार्यक्रम रुपरेषाची माहिती पत्रक वाटण्याचे काम स्वयंसेवक सतपंथ महिला भजनी मंडळ महिलांनी शेतातील काम सोडून स्वयंस्फूर्तीने धार्मिक कार्यात, विना मोबदला सुरू करण्यात आलेले आहे. कार्यक्रमाच्या आमंत्रण पत्रिका जवळपास दोन लाख तयार केलेल्या असून दिनांक ६ डिसेंबर पासून वाटपाचे काम सुरू करण्यात आलेले आहे. सकाळी नऊ ते संध्याकाळी सात या वेळेमध्ये भुसावळ, यावल, रावेर, चोपडा, अमळनेर, जळगाव, बऱ्हाणपूर, या तालुक्यातील प्रत्येक गावातील कुटुंबांना घर ते घर कार्यक्रम पत्रिकांचे वाटप करण्यात येत आहे. कार्यक्रम पत्रिका वाटपासाठी सतपंथ महिला भजनी मंडळ फैजपूर, चिनावल, खडका, राजोरे, वढोदा, विटवा, निंबोल ही भजनी मंडळ चोख सेवा करीत आहे. मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर, गुजरात मध्ये सतपंथ भाविक भक्तगणांच्या माध्यमातून कार्यक्रम पत्रिकांचे वाटपाचे नियोजन केलेले आहे. कार्यक्रमाला उपस्थिती द्यावी असे आवाहन सतपंथ चारिटेबल ट्रस्ट तर्फे करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत