न्हावी येथील जिल्हा रुग्णालयात नेताना अत्यवस्थ महिलेची रुग्णवाहिकेतच प्रसूती,माता व बाळ सुरक्षित
न्हावी येथील जिल्हा रुग्णालयात नेताना अत्यवस्थ महिलेची रुग्णवाहिकेतच प्रसूती,माता व बाळ सुरक्षित
लेवाजगत न्यूज न्हावी -तालुक्यातील न्हावी येथील गरोदर मातेच्या प्रसूतीमध्ये अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे १०८ रूग्णवाहिकेद्वारे महिलेस जळगावला नेण्यात येत होते. पण, भुसावळ येताच महिलेच्या प्रसुतीकळा वाढल्या. त्यामुळे डॉक्टर व रुग्णवाहिका चालकाने समयसूचकता दाखवत महिलेची रूग्णवाहिकेतच सुरक्षित प्रसूती केली. महिलेने मुलीस जन्म दिला.
न्हावी येथील ग्रामीण रुग्णालयात एका गरोदर मातेला प्रसूतीसाठी दाखल केले होते. तपासणी अंती गर्भाशयातील बालकाची वजन कमी व स्थिती नाजूक असल्याचे १०८ या रुग्णवाहिकेद्वारे जळगावला पाठवण्याचा निर्णय झाला. त्यांना घेऊन जाणारी रुग्णवाहिका भुसावळ शहरात दाखल होणार महिलेच्या प्रसूती वेदना वाढल्या.
त्यामुळे रुग्णवाहिकेतील डॉ.एजाज अहमद शेख कलिमोद्दीन यांनी समयसूचकता दाखवत वाहन चालक ललित खैरे यांना सुरक्षित ठिकाणी थांबण्यास सांगितले. यानंतर महिलेची रुग्णवाहिकेत प्रसूती केली. महिला व नवजात बाळाला भुसावळच्या ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल केले.
पाऊण तासात बालिकेचा जन्म
सकाळी ९.३० वाजता १०८ रुग्णवाहिका न्हावी ग्रामीण रुग्णालयातून जळगावकडे निघाली. या प्रवासात डॉ.एजाज अहेमद शेख हे गरोदर मातेच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून होते. १० वाजता भुसावळात महिलेच्या प्रसुतीकळा वाढल्या. यामुळे डॉ.एजाज यांनी रुग्णवाहिकेतच त्यांच्या प्रसूतीचा निर्णय घेतला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत