Header Ads

Header ADS

नवरा कामानिमित्त बाहेरगावी, बायकोचे तरुणासोबत जुळले सूत, सासूला कुणकुण लागली अन् घडलं भयंकर

 

नवरा कामानिमित्त बाहेरगावी, बायकोचे तरुणासोबत जुळले सूत, सासूला कुणकुण लागली अन् घडलं भयंकर

 लेवाजगत न्युज उत्तर प्रदेशः वृद्ध महिलेच्या हत्येचं गुढ अखेर उकललं आहे. पोलिसांनी महिलेच्या हत्येप्रकरणी सून आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे. इशावती देवी असं मृत महिलेचे नाव असून ९ डिसेंबर रोजी तिचा मृतदेह गावातील लोकांना आढळला होता.

गावाबाहेर असलेल्या दुर्गादेवी मंदिराबाहेर गावकऱ्यांना एक मृतदेह आढळला होता. त्यानंतर चौकशी केल्यानंतर तो इशादेवी यांचा असल्याचं समोर आलं. त्यानंतर मयत महिलेच्या मुलाने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. १० डिसेंबरला शवविच्छेदननंतर गावकऱ्यांनी आरोपींना लवकरात लवकर जेरबंद करण्याची मागणी करत आंदोलन केलं होतं. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवताच तपासणीत एक भयानक सत्य समोर आलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेची मोठी सून नीतू देवीचे गावात राहणाऱ्या विशाल राव नावाच्या मुलासोबत अनैतिक संबंध होते. ते दोघं रोज गुपचूप गावाच्या बाहेर असणाऱ्या घरी भेटत होते. जेव्हा इशावती देवींना याची खबर लागली तेव्हा त्यांनी सुनेची कानउघडणी केली. तरीही नीतू आणि विशाल भेटत होते.

इतकं सांगूनही सून ऐकत नाही म्हटल्यावर इशावती देवीने तिला मी सगळं प्रकरण मुलाला जाऊन सांगेन अशी धमकी दिली. त्यानंतर सुनेने सासूची शपथ घेऊन मी पुन्हा असं करणार नाही, असं सांगितलं. मात्र, त्याचवेळी तिच्या डोक्यात सासूला कसं संपवायचं याचं प्लानिंग सुरू होतं.

६ डिसेंबर रोजी जेव्हा इशावती देवी घराबाहेर पडल्या तेव्हा सुनेने प्रियकराच्या मदतीने सासूची गळा घोटून हत्या केली. व दोन दिवस घरातच मृतदेह लपवून ठेवला. ज्यावेळी घरातून दुर्दंघी यायला सुरुवात झाली तेव्हा गावाबाहेरील दुर्गा मंदिराबाहेर मृतदेह फेकून दिला व फरार झाले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इशावती देवी यांना चार मुलं आणि दोन मुली आहेत. तिन्ही मुलांची लग्न झाली आहेत तर तिघंही राज्याबाहेर नोकरीसाठी राहतात. त्याचवेळी मोठी सून नीतूदेवी हिचं गावातील विशाल राव नावाच्या मुलासोबत सूत जमलं आणि त्यांच्यात अनैतिक संबंध निर्माण झाले. जेव्हा सासूचा अडथळा निर्माण झाला तेव्हा तिने प्रियकराच्या मदतीने सासूची हत्या केली. दरम्यान, पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.