Contact Banner

वादग्रस्त पत्रीशेड काढावे, सावदा पालिकेला साकडे रहिवाशांनी नगरपालिकेसह दिले डीवायएसपींना निवेदन

 

वादग्रस्त पत्रीशेड काढावे, सावदा पालिकेला साकडे रहिवाशांनी नगरपालिकेसह दिले डीवायएसपींना निवेदन

वादग्रस्त पत्रीशेड काढावे, सावदा पालिकेला साकडे रहिवाशांनी नगरपालिकेसह दिले डीवायएसपींना निवेदन 

लेवाजगत न्यूज सावदा- पालिकेच्या शहरातील गौसियानगर परिसरात काही ठराविक व्यक्तींनी पशुधन उतरण्यासाठी टीनपत्र्यांचा वापर करून दोन गोडावून -उभारले आहे. यामुळे भविष्यात कोणताही -अनुचित प्रकार टाळण्यासाठी व शहराची कायदा-सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी बेकायदेशीर गोडावून कायमस्वरूपी जमीनदोस्त करावे, अशी मागणी गौसियानगरातील रहिवाशांनी पालिका मुख्याधिकारी, डीवायएसपींकडे निवेदनातून केली आहे. एका महिन्यापूर्वी अवैध गोवंश वाहतुकीच्या वादातून शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडली होती. दोन आहेत. समाजात तेढ निर्माण झाली होती. शिवाय लंपी आजाराच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी गुराढोरांची वाहतूक करण्यास बंदी घातली आहे. तरीही राजरोसपणे सदरील गोडावूनमध्ये वाहनातून आणलेली जनावरे उतरवली गेल्याची बाब २२ डिसेंबर २०१२ रोजी येथील रहिवाशांना समजली. त्यामुळे त्यांनी संबंधितांवर कायदेशीर कारवाई करणे व वादग्रस्त टीनपत्र्याचे गोडावून तत्काळ हटवावे, अशी मागणी मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे. त्याची प्रत फैजपूर प्रांतांधिकारी, डीवायएसपी, पोलिस ठाण्यात देण्यात आली. या निवेदनावर शेख शकील अ. रउफ, शौकतखान लियाकत आदींच्या स्वाक्षऱ्या आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.