Contact Banner

महाराष्ट्र एक्स्प्रेससह ८ प्रवासी गाड्या रद्द

 


महाराष्ट्र एक्स्प्रेससह ८ प्रवासी गाड्या रद्द 

लेवाजगत न्यूज जळगाव -कोपरगाव ते कान्हेगाव दरम्यान एनआय आणि नॉन एनआय आणि डबल लाइन यार्ड रिमॉडेलिंगची कामे रेल्वे प्रशासनाने हाती घेतली आहेत. त्यासाठी प्रशासनाने ३ ते २४ जानेवारी काळात ब्लॉक घेण्यात आला आहे.महाराष्ट्र एक्स्प्रेस सलग तीन दिवस व इतही ८ गाड्या रद्द केल्या आहेत. ज्यांनी रद्द झालेल्या गाड्यांचे आधीच आरक्षण केले आहे, त्यांना तिकिटाचा परतावा मिळेल. ऑनलाइन तिकिटे काढले असल्यास बँक खात्यात रक्कम वर्ग होईल, असे मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने सांगितले. 

       रद्द असलेल्या गाड्या : २२१४७दादर-साईनगर शिर्डी एक्स्प्रेस ६ ते १३ व २० जानेवारी, २२१४८ साईनगर शिर्डी-दादर एक्स्प्रेस ७ ते १४ जानेवारी व २१ जानेवारी, १२१३१दादर-साईन गर शिर्डी एक्स्प्रेस २३ जानेवारी, १२१३२ साईनगर शिर्डी-दादर एक्स्प्रेस २४ जानेवारी, ०११३५ भुसावळ-दौंड मेमू गाडी ५ ते १२ जानेवारी व १९ जानेवारी, ०९३३६ दौंड-भुसावळ मेमू गाडी ५ ते १२ व १९ जानेवारी, ११०३९ कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस २१, २२, २३ जानेवारीला रद्द असेल. गोंदिया- कोल्हापूर एक्स्प्रेसही रद्द आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.