Contact Banner

दहावी बारावीच्या परीक्षेसाठी पूर्ण वेळ असणार केंद्रावर बैठे पथक

10th-12th-examination-full-time-shall-be-centered-seating-squad


 दहावी बारावीच्या परीक्षेसाठी पूर्ण वेळ असणार केंद्रावर बैठे पथक 

लेवाजगत न्यूज नाशिक -महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 21 मार्चदरम्यान तर दहावीची परीक्षा 2 ते 25 मार्चदरम्यान घेतली जाणार आहे. या परीक्षेदरम्यान गैर प्रकारांना आळा बसावा यासाठी परीक्षा केंद्रांवर शिक्षण विभागातर्फे कठोर पावले उचलली जाणार असल्याचे मंडळातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. यात नेमण्यात येणारे बैठे पथक पूर्णवेळ असेल असे म्हटले आहे.

     परीक्षेच्या काळात कॉपीसारख्या गैरप्रकार टाळण्यासाठी बैठे पथक विशिष्ट शाळा- महाविद्यालयात पेपरच्या संपूर्ण वेळेत बसेल. बैठे पथकात कमीत कमी चार सदस्य असतील. त्यातील दोन सदस्य प्रत्येक परीक्षा ब्लॉकमधून फेरी मारतील, दोन सदस्य परीक्षा केंद्राच्या आवारात "लक्ष' ठेवतील. परीक्षा दालनात गैरप्रकार निदर्शनास आल्यास पथकाने त्याची नोंद घेऊन केंद्र संचालकाच्या निदर्शनास आणावी. आवश्‍यक त्या सुविधांसाठी पोलीसांची मदत घेण्यात येईल. परीक्षा केंद्राच्याबाहेर कॉपी पुरविणाऱ्यांचा घोळका असेल तर त्यावर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त असेल. विद्यार्थ्यांना पेपर लिहिण्यात अथवा परीक्षा संचालनात अडचण होणार नाही, याची काळजी त्या-त्या केंद्राने घ्यावी असे विभागीय शिक्षण मंडळाने म्हटले आहे.

    भरारी पथकांचे लक्ष 

    दहावी, बारावीच्या परीक्षा पारदर्शक वातावरणात पार पाडण्याची जबाबदारी जिल्हा दक्षता समितीची असेल. जिल्हा दक्षता समिती, जिल्हा प्रशासन, जिल्हा पोलिस प्रशासन, शिक्षण विभागाने परीक्षा पारदर्शक व भयमुक्त वातावरणात घेण्यासाठी सज्ज असणार आहेत. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समिती गठित करण्यात येणार आहे. विभागातील जालना, बीड, परभणी, हिंगोली, औरंगाबाद या पाच जिल्ह्यातून बारावीचे एक लाख 78 हजार 499 विद्यार्थी; तीन मार्चपासून सुरु होणाऱ्या दहावीची परीक्षेसाठी 1 लाख 66 हजार 964 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.