Header Ads

Header ADS

जळगांव जिल्ह्यातील मोबाईल सेवेपासून वंचित ५२ गावांना 4G सेवासाठी मिळणार टॉवर ; खासदार रक्षाताई खडसे


 जळगांव जिल्ह्यातील मोबाईल सेवेपासून वंचित ५२ गावांना 4G सेवासाठी मिळणार टॉवर ; खासदार रक्षाताई खडसे

लेवाजगत न्युज जळगांव (lewajagat news):-

डिजिटल सर्वसमावेशकता आणि संपर्क हा प्रधानमंत्री मा.नरेंद्रजी मोदी यांच्या सरकारच्या ‘अंत्योदय’ दृष्टिकोनाचा महत्वाचा भाग असून,  देशातील ५ राज्यांमधल्या ४४ आकांक्षी  जिल्ह्यांमधील 7,287 गावांना 4G मोबाईल सेवा पुरवण्यासाठीच्या प्रकल्पाला सरकारने  गेल्या वर्षी मंजुरी दिली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2021 मध्ये आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या भाषणामध्ये सरकारी योजना शेवटच्या घटकापर्यंत पूर्णतः  पोहोचवण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार केंद्रीय मंत्रिमंडळाने 4G मोबाईल सेवा, देशातल्या वंचित गावांमध्ये पोहोचवण्यासाठी एकूण रु.२६,३१६/- कोटी खर्चाच्या प्रकल्पाला मंजुरी दिली होती.  (4G)


‘आत्मनिर्भर भारत’ 4G तंत्रज्ञान स्टॅक प्रणालीचा वापर करून भारत संचार निगम लि. (बीएसएनएल) द्वारे हा प्रकल्प अमलात आणला जाईल, तसेच त्याला “युनिव्हर्सल सर्व्हिस ऑब्लिगेशन फंड” मार्फत अर्थसहाय्य केले जाईल.(Lewajagat news) त्यानुसार खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी जळगांव जिल्ह्यातील श्रेणी १ साठी २६ व श्रेणी २ साठी ८३ गावांची शिफारस केली होती. त्यापैकी श्रेणी १ साठी १५ तर श्रेणी २ साठी ३७ अशा एकूण ५२ गावांची ४जी सेवेसाठी निवड करण्यात आलेली असून, त्यासाठी राज्यतील महसूल विभागाकडून मोबाईल टॉवर उभारणीसाठी परवानगी घेण्यात येणार आहे. अशी माहिती यावेळी खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी दिली.(Rakshatai khadse)


हा प्रकल्प ग्रामीण भागात मोबाईल कनेक्टिविटी उपलब्ध करून देण्याच्या सरकारच्या दृष्टीकोनाच्या दिशेने महत्वाचे पाउल आहे. हा प्रकल्प मोबाईल ब्रॉडबँडच्या माध्यमातून विविध ई-प्रशासन सेवा, बँकिंग सेवा, टेली-मेडिसिन, टेली-शिक्षण अशा विविध सेवा वितरणाला प्रोत्साहन देईल आणि ग्रामीण भागात रोजगार निर्माण करेल. (Jalogaon)असे यावेळी खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.