दिघोडे गव्हाण फाटा वाहतूक कोंडी बाबत मनसे छेडणार आंदोलन मनसे विभाग प्रमुख संदिप ठाकूर यांनी दिले वरिष्ठ पोलीस ठाणे उरण तसेच वाहतूक शाखेला निवेदन
दिघोडे गव्हाण फाटा वाहतूक कोंडी बाबत मनसे छेडणार आंदोलन मनसे विभाग प्रमुख संदिप ठाकूर यांनी दिले वरिष्ठ पोलीस ठाणे उरण तसेच वाहतूक शाखेला निवेदन
उरण (लेवाजगत प्रतिनिधी सुनिल ठाकूर).दिघोडे गव्हाण फाटा तसेच दिघोडे दास्तान फाटा या रस्त्यावर कंटेनर यार्ड वाल्यानी स्व:ताची पार्किंग न ठेवल्याने कंटेनर रस्त्याच्या बाजूला पार्किंग केले जातात.या अवजड कंटेनर पार्किंग मुळे दिघोडे गव्हाण फाटा ,दिघोडे दास्तान फाटा या रस्त्यावर वाहतूक कोंडीची मोठी समस्या बनली आहे .या वाहतूक कोंडीचा सर्वसामान्य जनतेला त्रास सहन करावा लागत आहे.
तसेच दिघोडे येथील वळण ये अवजड कंटेनर वाहतुकी साठी बंदी असताना सुद्धा या वळणावरून अवजड कंटेनर वाहतूक होत आहे या वाहतुकी मुळे अपघाताचे प्रमाणं वाढले आहे .या बेकायदेशीर वळणावरून अवजड कंटेनर ची वाहतूक होत असल्याने बस थांब्यावर उभे असणाऱ्या प्रवाशाना आपले जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे .या सर्व समस्या लक्षात घेऊन या वळणावरून अवजड वाहतूक बंद करावी तसेच दिघोडे गव्हाण फाटा .तसेच दिघोडे दास्तान् फाटा रस्त्यावरिल् अवैध पार्किंग हटवावी अन्यथा मनसे च्या वतीने जिल्हा अध्यक्ष संदेश ठाकूर .तालुका अध्यक्ष सत्यवान भगत,उपाध्यक्ष मंगेश वाजेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन छेडण्याचा ईशारा देण्यात आला आहे.याबाबत जिल्हा अध्यक्ष संदेश ठाकूर तालुका अध्यक्ष सत्यवान भगत उपाध्यक्ष मंगेश वाजेकर यांच्यावतीने वरिष्ठ पोलीस ठाणे उरण तसेच वाहतूक नियंत्रण उरण यांना निवेदन देण्यात आले आहे .
यावेळी तालुका उपाध्यक्ष मंगेश वाजेकर .विभाग अध्यक्ष संदीप ठाकुर.शाखा अध्यक्ष समाधान गोंधळी,विलास नवाले, किरण घरत, शैलेश पाटील आदी सह मनसैनिक उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत