अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी केल शासनाला मोबाईल वापस, वरुड येथे आयटक संघटनेचे आंदोलन !
अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी केल शासनाला मोबाईल वापस,
वरुड येथे आयटक संघटनेचे आंदोलन !
वरुड ( तालुका प्रतिनीधी )आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन वरुड च्यावतिने आज शुक्रवारला आयटक संघटनेच्या वतीने उज्वला गुळांदे रत्नमाला ब्राम्हणे यांच्या नेतृत्वात बाल विकास प्रकल्प कार्यालयात खराब झालेले मोबाईल जमा करण्यात आले. यावेळी सावित्री फुले,माँ जिजाऊ यांचा विजय असोच्या घाषणा देण्यात आल्या शासकीय बोंबल्या परत घ्या.चांगल्या प्रतिचा टँब मोबाईल मिळालाच पाहिजे,शिक्षण आम्हच्य हक्काच नाही कुणाच्या बापाच इत्यादी घोष देण्यात आल्या शासनाने २०१९ ला दिलेले मोबाईल निकृष्ट दर्जाचे आहेत अशा अनेक तक्रारी यापूर्वी शासन व प्रशासनाकडे केल्या परंतु अजून पर्यत नविन मोबाईल दिले नाही त्यामुळे अंगणवाडी सेविका अडचणीत सापडल्या आहेत. आतातर मोबाईल चालत नाही अँप डाऊनलोड होत नाही झालेतर भरलेली माहीती अपलोड होत नाही चांगल्या प्रतिचा,मोबाईल द्या.पोषण टँकर मराठी द्या या मागणीसाठी राज्यभर ३ जानेवारी पासून आयटक च्यावतिने आंदोलन सुरु आहेत मा.आयुक्त रुबल अग्रवाल यांनी संघटना प्रतिनिधीची सोबत बैठक घेवून नविन मोबाईल देण्यात येईल असे आश्वासन दिले .त्यानुसार शासनास प्रस्ताव दिला बजेट अधिवेशनात महाविकास आघाडी सरकारने नविन मोबाईल साठी दहा हजार रुपये देण्यास येईल असे बजेट मध्ये तत्कालीन वित्त मंत्री अजीतदादा पवार यांनी मंजूर केले सरकार बदलली परंतु अंगणवाडी सेविकांना मोबाईल अजून पर्यत देण्यात आले नाही
शासनाने दिलेला मोबाईल नादुरुस्त आहे व त्यात हा ऍप डाऊनलोड होत नाही त्यामुळे त्यांना आपल्या खाजगी मोबाईलवर ऍप डाऊनलोड करायला सांगितले जात आहे.
शासनाने दिलेल्या मोबाईल पैकी ९०% मोबाईल खराब आहे नविन एँप डाऊनलोड होत नाही त्यामुळे सर्व सेविकानी मोबाईल शासनास परत केले आहे. यावळी तालुक्यातील शेकडो अंगणवाडी सेविकांनी पंचायत समिती कार्यालयासमोर स्थीत मोर्चामध्ये सहभाभी झाल्या होता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत