माघ महिना (शिशिर ऋतूतील पहिला मास) डॉ. अनिता बेंडाळे
माघ महिना (शिशिर ऋतूतील पहिला मास)
डॉ. अनिता बेंडाळे
शिशिर ऋतूतील पहिला मास.या महिन्याच्या पौर्णिमेस वा पुढे -मागे मघा नक्षत्र येते.म्हणून यास माघ हे नाव पडले आहे.माघ महिन्यात उत्तरा यण सुरू झाल्यामुळे थंडीचा जोर हळूहळू कमी होत जातो.या मासात अनेक धार्मिक व्रत- वैकल्ये केली जातात.पौष महिन्याच्या पौर्णिमे पासून केलेले माघ पुण्यकारक आणि आध्यात्मिक ऊर्जा देणारे मानले जाते.
18 फेब्रुवारी ला महाशिवरात्री च्या दिवशी हा महिना संपेल.माघ हा भगवान विष्णू,सूर्यदेव, गंगा मातेचा महिना समजला जातो.या महिन्यात धार्मिक कार्यासोबत गंगा स्नान,दान आणि पूजेचे महत्त्व सर्वाधिक मानले जाते.या काळात देवता स्वर्गातून मानव रुपात पृथ्वी वर येतात आणि मंत्रोच्चाराह प्रयाग मध्ये स्नान करतात.ब्रम्ह,महेश,आदित्य,मरुदंगण आणि सर्व देवी देवता माघातील संगमा वर स्नान करतात.
शास्त्र नुसार माघी स्नानाचा सर्वोत्तम मुहूर्त ताऱ्यांचा उगम होतो ती सूर्योदयापूर्वीची घटिका मानली जाते उषकाली ,संध्याकाळी आणि मध्यान्हच्या सावित्री मुहूर्तावर स्नान करणे शरीर,मन,आणि आत्माच्या शुद्धी साठी उचित मानले जाते. पाणी हे शुद्धीकरनाचे साधन आहे.म्हणूनच देह,मन,आत्मा,यांच्यातील संतुलन आणि शुद्धता यासाठी माघ स्नानाचा शांत करणारा रिवाज सनातन धर्माने घालून दिला आहे.
वैज्ञानिक दृष्टिकोनातून याची तुलना थर्मोकपल सोबत केली जाते.ज्याचा एक फेज एग्निशन म्हणजे अग्नी सोबत जोडलेला असतो तर दुसरा कुलीग सोबत उत्पादन प्रकिया आणि मॅकनिकाल इजिनिअरिंग मध्ये थर्मोकपल चे संतुलन महत्वाचे ठरते .कोणत्याही रासायनिक संयुगा दरम्यान प्रथम kayslinetion प्रक्रिया होते,त्यात तपमान वाढवले जाते आणू नंतर त्या रसायनांस थंड आणि शुद्ध करण्यासाठी distiletion वापरले जाते,निसर्गातही उष्मा आणि शीतलता यांच्या थर्मोकपलचे चक्र असते. आपल्या शरीराचा एकेक अणू आणि कोश तपस्या किंवा साधना करतात,एखादे लक्ष्य साध्य करण्यावर एकाग्र होतात तेव्हा निर्माण होणाऱ्या उर्जेस वा उष्म्यास अग्नी म्हणतात आणि त्यास शांत व संतुलित करण्यासाठी सोम स्नान अर्थात थर्मोकपल गरजेचे असते.
डॉ. अनिता बेंडाळे
नाशिक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत