धनोडी येथे चार वर्षीय शिवाचा विहिरीत पडून मृत्यू ! चार तासांच्या प्रयत्नांनंतर सापडला मृतदेह !
धनोडी येथे चार वर्षीय शिवाचा विहिरीत पडून मृत्यू ! चार तासांच्या प्रयत्नांनंतर सापडला मृतदेह !
लेवाजगत न्युज वरूड :- तालुक्यातील धनोडी येथे राहत्या घरी दोन भावंड खेळत असताना यातील चार वर्षे वयाच्या शिवा पतंगच्या नादात घरच्या विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी ११ वाजता घडली.मृतदेह विहिरीतून काढण्यास पोलीस आणि नागरिकांना तब्बल चार तासानंतर यश आले.
प्राप्त माहिती नुसार ,मृत शिवा उर्फ शिवान्श सुमित मानकर ४ रा. आंबेडकर नगर धनोडी असे नावं आहे. मृतक शिवा आणि त्याचा चुलत भाउ घराच्या आवारात सोबत खेळत होते. दरम्यान एक पतंग घरातील विहिरीच्या वर ठेवलेल्या टिन पत्र्यावर पडली. ही पतंग काढण्याकरिता मृत शिवा पत्र्यावर गेला आणि पत्र्यसहित विहिरीत पडला. सोबतच्या भावंडांने शिवा विहिरीत पडल्याची माहिती घरातील लोकांना दिली.
ही घटना रविवारला सकाळी ११ वाजता घडली. मात्र विहिरीतील पाणी मोठ्या प्रमाणात असल्याने पाण्यात बुडाला. शेन्दुरजना घाट पोलिसांना माहिती मिळताच ठाणेदार सतीश इंगळे सह पथकांनी घटनास्थळ गाठले.यावेळी विहिरीतील पाण्याचा १० एच पी पंप लाउन विहिरीचा उपसा केला. अखेर चार तासानंतर दुपारी ३ वाजता मृतदेह हाती लागला.यावेळी शेकडो नागरिकांनी एकच गर्दी केली होती. पोलीसांनी मृतदेह ग्रामीण रुग्णालयात नेऊन शवविच्छेदन करून नातेवाईकानाच्या स्वाधीन केला.
या घटनेची आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास ठाणेदार सतीश इंगळे सह शेन्दुरजना घाट पोलीस करीत आहे. आई वडिलांचा एकुलता एक मुलगा शिवा होता. सर्वत्र शोककला पसरली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत