डोंबिवली येथील लेवा सखी कलामंच आयोजित हळदी कुंकू व सत्कार समारंभ उत्साहात
डोंबिवली येथील लेवा सखी कलामंच आयोजित हळदी कुंकू व सत्कार समारंभ उत्साहात
लेवाजगत न्यूज डोंबिवली -येथील लेवा सखी कलामंच व परिसर आयोजित हळदी कुंकू समारंभ विशेष पारितोषिक मिळविलेल्या मुलामुलींचा सत्कार व सांस्कृतिक कार्यक्रम दि.22/01/2023. रोजी डोंबिवली (पूर्व ) येथील डी. एन. सी. सभागृह येथे आयोजित करण्यात आला. सदर कार्यक्रमासाठी अध्यक्षा म्हणून सौ. मधुबाला जनार्दन जंगले उपस्थित होत्या. विशेष अतिथी म्हणून डॉ. सौ. प्रिती चौधरी उपस्थित होत्या. उद्योजक महिला म्हणून डॉ.नयना गोपाल पाचपांडे तर सौ.दिपाली दिपक तळेले (मीरारोड ) उपस्थित होत्या.
या कार्यक्रमासाठी वाण, तिळगुळ व फुले यासाठी मदत करणाऱ्या डॉ. सौ. सुजाता विवेक भारंबे तर लकी ड्रॉ साठी व अल्पपोहार देणाऱ्या सौ.ज्योती राजन मराठे (नगरसेविका ) या आवर्जून उपस्थित होत्या. या कार्यक्रमासाठी लेवा सखी कलामंच डोंबिवली व परिसरच्या कार्याविषयी आपुलकी असल्यामुळे विरार येथून खास सौ.सुरेखा कुरकुरे (नगरसेविका )उपस्थित होत्या. या व्यतिरिक्त इतर महिला मंडळाच्या काही खास महिला प्रतिनिधी उपस्थित होत्या. त्यामध्ये सौ. प्रतिभा किसन वराडे. (अंबरनाथ ) सौ. कुंदा झोपे. (उल्हासनगर ) सौ. शारदाताई चौधरी. (कल्याण ) सौ. प्रियंका बोरोले. (अ. नगर ) सौ. मनीषा बेंडाळे. (ऐरोली) सौ. वर्षा इंगळे. (पनवेल ) सौ. भाग्यश्री पाचपांडे. (ठाणे ) सौ. मनीषा कोल्हे. (ठाणे )यांची उपस्थितीमुळे कार्यक्रमाला खास शोभा आली. सदर कार्यक्रमाच्या सुरवातीला लेवा सखी कलामंच व परिसरच्या संस्थापिका व अध्यक्षा सौ. निशा शांताराम अत्तरदे यांनी थोडक्यात आपले मंडळाविषयी आपले
मनोगत व्यक्त केले. उपस्थित सर्वांचे परिचय सौ. मनीषा भंगाळे यांनी केले. त्यानंतर सर्व उपस्थितांचे सत्कार शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ लेवासखीचे स्मृतिचिन्ह (ट्रॉफी ) देऊन सत्कार करण्यात आला. सदर स्मृतिचिन्ह, कॅलेंडर व पुस्तिका, पुणा सन्स अँड गाडगीळ यांच्या तर्फे सभागृहातील मान्यवर महिला व लेवा सखींना वाटप करण्यात आले. कार्यक्रमासाठी खास करून पुणा सन्स अँड गाडगीळ यांच्या प्रतिनिधी हजर होत्या. विशेष पारितोषिक मिळविलेल्या मुलांमध्ये कु. अरव प्रशांत चौधरी याने जलतरण स्पर्धेत बेंगलोर येथे राष्ट्रीय पातळीवर 2022 मध्ये विशेष प्रविण्य मिळविले व कु. मुकुल सुहास वाणी याने फेंटो उपगृह पलोडे क्यूब मेकिंग मध्ये डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम फाउंडेशन तर्फे विशेष पारितोषिक मिळविले. यांचे गिनीज बुकामध्ये नोंद झाली. त्याबद्दल त्यांचा सखी मंडळातर्फे सत्कार करण्यात आला.बाकी उपस्थित त्यांच्या पाल्यांचे पारितोषिक त्यांच्या पालकांनी स्वीकारले.
सदर कार्यक्रमासाठी 250 महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम उत्तम प्रकारे सादर करण्यात आले. कार्यक्रमाची सुरवात सौ. मनीषा भारंबे. यांनी प्रार्थना सादर करून केली. पसायदान सुद्धा त्यांनीच सादर केले. सूत्रसंचालन सौ. रागिणी फालक. तर सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन
सौ. सायली पाटील यांनी उत्कृष्ट पार पाडले. हळदी कुंकू व इतर कामे सुनियोजित सर्व लेवा सखी कलामंच डोंबिवली व परिसरच्या समस्त कार्यकारिणी सदस्य व इतर महिलांनी अतिशय सुंदर पद्धतीने पार पाडले. आभार प्रदर्शन सौ. मनीषा नेमाडे यांनी केले. व हळदी कुंकू समारंभाची सांगता केली. उपस्थित लेवा सखींनी आयोजिका व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत