औरंगाबाद येथील वाळूज एमआयडीसी'मधील प्लास्टिक कंपनीला भीषण आग
औरंगाबाद येथील वाळूज एमआयडीसी'मधील प्लास्टिक कंपनीला भीषण आग
लेवाजगत न्यूज औरंगाबाद -औरंगाबादमध्ये वाळूज 'एमआयडीसी'मधील एका प्लास्टिक कंपनीला भीषण आग लागली असून, परिसरातील अनेक घरांनीही पेट घेतल्याचे समजते. सध्या अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल झाली आहेत. त्यांनी आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केलेत.
प्लास्टिक कंपनीला आग कशामुळे लागली हे अजून समजले नाही. या घटनेत किती हाणी झाली, हे समोर आले नाही.
औरंगाबादमधील जोगेश्वर परिसरातल्या वाळूज 'एमआडीसी'मध्ये साहिल प्लास्टिक कंपनी आहे. या कंपनीमध्ये काही वेळापूर्वी आग लागल्याचे समोर आले आहे. ही माहिती समजताच अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी पोहचली आहेत. त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
कंपनीला लागलेली आग प्रचंड भीषण आहे. दूरवरून आगीचे उटलेले लोळ दिसत आहेत. हे पाहून अनेक नागरिकांनी या कंपनीकडे धाव घेतली. त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न सुरू केले आहेत. पाण्याने भरलेले टँकरही मागवण्यात आले आहे.
कंपनीच्या चारही बाजूचा परिसर हा रहिवासी आहे. येथे अनेक सोसायटी आहेत. यातली अनेक घरांना आग लागल्याचे समजते. या घटनेत अजून तरी कसलिही जीवित हाणी झालेली नाही. आग आटोक्यात आणण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र, आगीचे नेमके कारण अजून समोर आले नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत